आयपीएल च्या १५ व्या हंगामाचा मेगा लिलाव(IPL 2022) बंगळुरू येथे पार पडला. या लिलावात २ नविन संघांचा समावेश करण्यात आला आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. पहिल्या दिवसाची सुरुवात शिखर धवनच्या बोली (Shikhar dhawan) पासून झाली. शिखर धवनला पंजाब किंग्जने विकत घेतले. त्यानंतर धवनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शिखरने एक व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. धवनची लिलावासाठीमूळ किंमत २ कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम शिखर धवनसाठी बोली लावण्यास सुरुवात केली, त्यानंतर राजस्थान रॉयल्सने बोली लावली. शिखर धवनसाठी दिल्ली आणि राजस्थान संघामध्ये शिखरला संघात घेण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण, शेवटी पंजाब किंग्ज संघाने त्याच्यावर ८.२५ कोटींची बोली लावली. धवन या अगोदर दिल्ली संघाचा भाग होता.
पंजाब संघात सहभागी झाल्यानांतर त्याने पंजाबी भाषेत एक मेसेजसुद्धा लिहिला आहे. धवनचा हा व्हिडीओ मेसेज पंजाब फ्रँचायझीने शेअर करत आणि धवनचे संघात स्वागत केले आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणाला की, ‘”मला खूप आनंद होतोय की, मी पंजाब किंग्ज संघात सहभागी झालो आहे. मी आता पुढच्या हंगामाची वाट पाहत आहे. आम्ही सगळे शानदार खेळू. तुम्हा सर्वांच्या अशिर्वाद आणि प्रेमासोबतच ट्रॉफी नक्की जिंकून येऊ.”
Welcome our Gabru Gabbar with a ♥️ ⤵️#TATAIPLAuction #SaddaPunjab #PunjabKings #IPLAuction @SDhawan25 pic.twitter.com/nWHv9OQCC8
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 12, 2022
धवन मागील हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघासाठी उत्तम खेळला आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससह, सनरायझर्स हैद्राबाद, मुंबई, पुणे या संघांसाठी सुद्धा तो खेळला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९२ समाने खेळले असुन ३४.६३ च्या सरासरीने ५७८४ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वात जास्त ६५४ चौकार लागावणारा खेळाडू आहे
रविवारी (१३फेब्रुवारी ) उरलेल्या खेळाडूंवर बोली लागणार आहे. आता कोणत्या खेळाडूवर किती बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर्षी आयपीएलमध्ये दोन नविन संघ समाविष्ट झाल्यामुळे हा लिलाव दोन दिवस चालणार आहे. लिलावात ५९० खेळाडूंनी सहभाग नोदवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL Auction: ऑक्शनच्या पहिल्या दिवसांनंतर अशी आहे सर्व संघांची स्थिती
धोनीबाबत सीएसकेच्या सीईओंचे मोठे विधान; म्हणाले, “तो संघ…”
मोठ्या रकमेची अपेक्षा असताना ‘या’ युवा खेळाडूंना मानावे लागले कमी किमतीत समाधान