इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामामध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. सर्वच संघानी आपला पहिला सामना खेळला आहे. या हंगामात फलंदाज धडाकेबाज खेळी खेळताना दिसत आहेत. पंधराव्या हंगामाच्या पहिल्या काही सामन्यांतच ओडिन स्मीथ, संजू सॅमसन आणि दीपक हूड्डा यांची शानदार खेळी पाहायला मिळाली आहे. परंतू दुसरीकडे काही खेळाडूंनी खाते सुद्धा उघडले नाही.
आयपीएल २०२२ च्या पहिल्या पाच सामन्यात एकूण ८ खेळाडू शून्यावर बाद झाले आहेत. यामध्ये अशा एका खेळाडूचा समावेश आहे, ज्याला फ्रॅंचायझीने १६ कोटींना विकत घेतले आहे. या लेखात आपण या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
आयपीएल २०२२ मध्ये पहिल्याच चेंडूवर दोन खेळाडू बाद झाले. ज्यामध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल, जो गुजरात टायटन्सविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पंजाब किंग्सचा राज बावा देखील आरसीबीलविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तसेच सीएसकेचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड देखील शून्यावर बाद झाला, तो केकेआरविरुद्ध चौथ्या चेंडूवर बाद झाला.
हेही वाचा – हिरोवरून थेट ‘झिरो’, ऋतुराजची IPL १५व्या हंगामाची सुरूवात चाहत्यांसाठी वेदनादायी
तसेच दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज मनदीप सिंगला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अपयश आले. रोव्हमन पाॅवेल देखील खाते न उघटताच पेव्हिलियनमध्ये परतला. गुजरात टायटन्सचा सलामिवीर शुभमन गील लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शून्य धावांवर बाद झाला आणि हैदराबादचा निकोलस पुरन आणि राहुल त्रिपाठी राजस्थानविरुद्ध खाते न खोलताच तंबूत परतले.
हेही वाचा – ब्रेंडन मॅक्यूलम आणि केएल राहुल; दोघांच्याही नावावर मरेपर्यंत न विसरवता येणारा IPLचा ‘नकोसा विक्रम’
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ संघाने केएल राहुलला (KL Rahul) १६ कोटींना विकत घेतले आहे, त्याला नव्या फ्रॅंचायझीने कर्णधार देखील बनवले आहे. परंतू, पहिल्या सामन्यातील त्याची कामगिरी त्याच्या किमतीला साजेशी नाही. के एल राहुल या अगोदर पंजाब किंग्स संघाचा कर्णधार होता. तो भारतीय संघासाठी देखील खेळला आहे. त्याने त्याच्या आयपीए कारकिर्दीत ९५ सामन्यांमध्ये ३२७३ धावा केल्या आहेत.
(IPL 2022 Eight Batsmen Out on Zero Runs In First 5 Five Matches Including Ruturaj Gaikwad And KL Rahul)
महत्त्वाच्या बातम्या –
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “मला आयपीएलमध्ये १५ कोटी मिळाले असते”
VIDEO | खरंच केन विलियम्सन आऊट होता की नाही..? तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे चाहते नाराज