अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्या आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावले. हार्दिक पंड्याने आजपर्यंत आयपीएलचा एकही अंतिम सामना गमावला नव्हता आणि त्याने यावर्षी देखील अंतिम सामना जिंकला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला आणि त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी उचलली. मागच्या सहा वर्षांनंतर एक नवीन संघाला ही ट्रॉफी जिंकण्याना मान मिळाला आहे.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन बलाढ्य संघांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. मुंबई इंडियन्स सर्वाधिक ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. तर सीएसकेने ही कामगिरी चार वेळा केली आहे. मागच्या सहा वर्षांमध्ये या दोन संघांमध्ये विजेतेपद विभागून गेल्याचे पाहायला मिळते, पण यावर्षी गुजरात टायटन्सने हे सत्र थांबवले. आयपीएलला मागच्या सहा वर्षानंतर मुंबई आणि सीएसकेव्यतिरिक्त नवीन संघ विजेता म्हणून मिळाला आहे.
आयपीएल २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१८ मध्ये सीएसकेने, तर २०१९ मध्ये पुन्हा मुंबईकडे विजेतेपद आले. आयपीएल २०२० मध्ये पुन्हा मुंबई, तर आयपीएल २०२१ मध्ये सीएसकेने विजेतेपद पटकावले होते. या दोने संघांचे विजयाचे सत्र आता गुजरातने रोखले आहे. यावर्षी मुंबई आणि सीएसके या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. मुंबई इंडियन्स तर यावर्षी गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता.
दरम्यान, आयपीएच्या अंतिम सामन्याचा विचार केला, तर संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानने निर्धारीत २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १३० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने हे लक्ष्य १८.१ षटकात गाठले.
महत्त्वाची गोष्ट अशी की, गुजरातने पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावले असल्याने राजस्थान रॉयल्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. यापूर्वी राजस्थानने २००८ मध्ये पहिल्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली जिंकले होते.
गेल्या ६ वर्षीचे आयपीएल विजेते संघ
आयपीएल २०१७ – मुंबई इंडियन्स
आयपीएल २०१८ – चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल २०१९ – मुंबई इंडियन्स
आयपीएल २०२० – मुंबई इंडियन्स
आयपीएल २०२१ – चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल २०२२ – गुजरात टायटन्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
गुजरातचे प्रशिक्षक कर्स्टन म्हणातेय, ‘नेहराबरोबर काम करण्याची मजाच वेगळी, तो…’
आयपीएलचा किताब जिंकल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंचे जोरदार सेलिब्रेशन, Photoतून तुम्हीही घ्या आनंद