---Advertisement---

IPL Final | फक्त २५ धावा अन् बटलर मोडेल वॉर्नरचा मोठा विक्रम, विराटलाही पछाडण्याची संधी

On: रविवार, मे 29, 2022 6:38 PM
Jos-Buttler
---Advertisement---

अहमदबाद| तब्बल दोन महिन्यापूृर्वी सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम संपत आला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (२९ मे) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला सायंकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे.

राजस्थानचा संघ २००८चा पहिला आयपीएल किताब जिंकल्यानंतर आता पुन्हा एकदा १४ वर्षांनी अंतिम सामन्यात दाखल झाला, तर गुजरातचा संघ हा पदार्पणाचा आयपीएल हंगाम खेळत असून अंतिम सामन्यात पोहोचला आहे.

या हंगामात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने (Jos Buttler) तूफानी फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने आतापर्यंत १६ सामन्यांमध्ये ५८.८६च्या सरासरीने ८२४ धावा केल्या आहेत. त्याने जर गुजरात विरुद्धच्या सामन्यात २५ किंवा अधिक धावा केल्या तर त्याला आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेविड वॉर्नरला पछाडत दुसऱ्या क्रमांकावर येण्याची संधी आहे.

आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (२८ मे २०२२ पर्यंत)-
९७३ – विराट कोहली (२०१६)
८४८ – डेविड वॉर्नर (२०१६)
८२४ – जोस बटलर (२०२२)*

इंग्लंडचा यष्टीरक्षक असलेल्या बटलरला या आयपीएल हंगामात फलंदाजीत चांगलीच लय सापडली आहे. त्याने चौकार- षटकारांचा पाऊस पाडत या हंगामात आतापर्यत चार शतके केली आहे. जर त्याने अंतिम सामन्यात शतक केले, तर तो आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो. कोहलीने २०१६च्या आयपीएल हंगामात चार शतके ठोकली होती.

त्याचबरोबर बटलरला आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. गेलने आयपीएलमध्ये सहा शतके केली आहेत. तर बटलरच्या नावावर पाच शतके आहेत.

आयपीएल सर्वाधिक शतक करणारे फलंदाज (२८ मे २०२२)-
६ शतक –  ख्रिस गेल
५ शतक – विराट कोहली, जोस बटलर
४ शतक – शेन वॉटसन, डेविड वॉर्नर, केएल राहूल

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

IPL Final 2022 I गुजरातसाठी स्वप्नवत प्रवास, तर राजस्थानने अनेक संकटे पार करत गाठलीये फायनल

आयपीएल २०२२च्या थरारक अंतिम सामन्यात ‘हा’ अभिनेता करणार कॉमेंट्री, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला

‘दडपणाखाली होतो, पण त्याच्या प्रेरणादायी शब्दांनी मदत केली’, बटलरने ‘या’ दिग्गजाला दिले यशाचे श्रेय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---