आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स चालू हंगामात मात्र निराशाजनक प्रदर्शन करत आहे. चालू आयपीएल हंगामात मुंबईने त्यांचे सुरुवातीचे सलग ७ सामने गमावले आहेत. एखाद्या संघाने हंगामाच्या सुरुवातीचे ७ सामने सलग गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुरुवारी (२१ एप्रिल) मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जने अखेरच्या चेंडूवर पराभूत केले. युवा फिरकी गोलंदाज ऋतिक शोकीनसाठी हा आयपीएल पदार्पणाचा सामना ठरला.
ऋतिक शोकीन (Hrithik Shokeen) या २१ वर्षीय फिरकी गोलंदाजाला आयपीएल २०२२च्या (IPL 2022) मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले होते. सीएसकेविरुद्ध मुंबईच्या संघ व्यवस्थापणाने त्याला पदार्पणाची संधी दिली. परंतु या सामन्यात ऋतिक एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याने टाकलेल्या ४ षटकात ५.७५च्या इकॉनॉमी रेटसह २३ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही.
ऋतिकने यापूर्वी इंडिया इमर्जिन आणि २३ वर्षाखालील संघासोबत ८ लिस्ट ए सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ४.९२च्या इकॉनॉमी रेटसह ८ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये तो यापूर्वी कधीच खेळला नव्हता आणि सीएसकेविरुद्धचा हा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला ठरला.
Hrithik Shokeen is all set to make his debut in Blue & Gold 🤩
Paltan, send your best wishes for the youngster 👇💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK @Hrithik14S pic.twitter.com/5CUNNqBenY
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
मुंबई इंडियन्सने हंगामातील त्यांचे सुरुवातीचे सहा सामने लागोपाठ गमावल्यानंतर संघात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणात्सव ऋतिकला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. त्याव्यतिरिक्त रिले मेरेडिथला देखील सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात मुंबईने प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले होते. त्याला मुरुगन अश्विनच्या जागी संघात स्थान दिले गेले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुळचा ऑस्ट्रेलियाचा असलेला रिले मेरेडिथ याआधीही आयपीएल खेळला आहे. यापूर्वी तो पंजाब किंग्जसाठी खेळत होता. आता तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला टी२० आणि एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ विकेट्सच्या नुकसानावर १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला, पण अखेर धोनीने संघाला विजय मिळवून दिलाच.