Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘यांच्यापेक्षा तर उनाडकटच भारी!’, रोहित अन् इशानची खेळी पाहून संतापले नेटकरी, होतायत जोरदार ट्रोल

'यांच्यापेक्षा तर उनाडकटच भारी!', रोहित अन् इशानची खेळी पाहून संतापले नेटकरी, होतायत जोरदार ट्रोल

April 22, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Ishan-Kishan-And-Jaydev-Unadkat-And-Rohit-Sharma

Photo Courtesy: iplt20.com


मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत एकही मोठी खेळी करू शकलेला नाहीये. चालू हंगामात रोहितचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. गुरुवारी (२१ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात रोहित एकही धाव करू शकला नाही आणि शून्य धावसंख्येवर विकेट गमावली. तसेच सलामीवीर इशान किशन देखील शून्य धावेवर बाद झाला. विशेष म्हणजे, त्यांना या सामन्यात चेन्नईकडून ३ विकेट्सने पराभवाचा सामनाही करावा लागला आणि हंगामातील सलग ७ सामने गमावले. या खराब प्रदर्शनानंतर नेटकरी या दोघांना सोशल मीडियावर ट्रोल करू लागले आहेत.

मुकेश चौधरीला (Mukesh Choudhary) सीएसकेसाठी टाकलेल्या पहिल्या षटकात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांच्या रूपात त्याच्या दोन मोठे मासे लागले. मुंबई इंडियन्सच्या या दोन्ही सलामीवीरांना स्वतःचे खाते देखील खोलता आले नाही. असे असले, तरी मध्यक्रमात तिलक वर्माने महत्वाची अर्धशतकी खेळी केली आणि मुंबईला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. तसेच, खालच्या फळीत जयदेव उनाडकट (Jaydev Unadakat) याने महत्वाच्या धावा केल्या. तिलक वर्माने ४३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या, तर उनाडकटने ९ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १९ धावा केल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने २१ चेंडूत ३२ धावा केल्या आणि विकेट गमावली. या खेळाडूंनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसानावर १५५ धावा केल्या. रोहित आणि ईशान किशनच्या खराब प्रदर्शनामुळे चाहते आणि जाणकारांनी नाराजी व्यक्त केली, तर सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच संतापलेले दिसले. नेटकऱ्यांनी या दोघांना चांगलेच ट्रोल केले आहे. उनाडकटची तुलना रोहित आणि ईशासोबत केली जाऊ लागली आहे.

सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया-
एक चाहता ट्वीट करत म्हणाला की, “सध्या उनाडकट हा रोहित शर्मा आणि इशान किशनपेक्षाही चांगला फलंदाज आहे.”

Unadkat is better batsman than current rohit sharma and any version of Ishaan kishan

— Balu (@Balu_abcdefghi) April 21, 2022

Even unadkat is batting well than ishan and rohit

— bee (@acancergeek) April 21, 2022

Unadkat showing Rohit and Ishan on how to play CSK bowlers in big 2022.#MIvCSK

— Aadarsh 💞 (@aadarshdixit2) April 21, 2022

Rohit Sharma is captain of Indian cricket national team
Think about it pic.twitter.com/cSMBULa8im

— The One (@SaneleMacamo) April 21, 2022

Rohit Sharma se zyada confidant to Jaydev Unadkat khelta hai🙄#CSKvsMi #MumbaiIndians

— Shubham (@Thatfirangi) April 21, 2022

@cricketaakash Does unadkat have more runs than Rohit Sharma in ipl 2022 ?

— arya packers movers (@AryaMovers) April 21, 2022

Continuously Unadkat has scored more runs than Rohit & Ishan 👀 #MIvCSK

— Swapnil Mistri (@swapnilmistri1) April 21, 2022

 

दुसरीकडे गोलंदाजांमध्ये सीएसकेसाठी मुकेश चौधरी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने टाकलेल्या ३ षटकात १९ धावा खर्च केल्या आणि ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मुकेशने मुंबईची वरची फळी उध्वस्त केली आणि संघाच्या अढचणी वाढवल्या. तसेच, मुंबईसाठी डॅनियल सॅम्सने ४ षटकात ३० धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

धोनीच्या विजयी चौकाराने मुंबईच्या स्वप्नांना सुरुंग! ३ विकेट्सने सामना घातला खिशात

चेन्नईच्या गोलंदाजाचा मुंबईविरुद्ध राडा! रोहित अन् इशानला शून्यावर बाद करत रचला ऐतिहासिक विक्रम

नाव मोठं अन् लक्षण खोटं! कोट्यावधी रुपयांमध्ये विकले गेलेले ‘हे’ तीन परदेशी खेळाडू ठरतायत फ्लॉप


ADVERTISEMENT
Next Post
MS-Dhoni-And-Rohit-Sharma

पराभवातही मुंबईचीच 'सत्ता!' आयपीएल इतिहासातील सर्वात लाजीरवाणा विक्रम पाच वेळच्या विजेत्याच्या नावे

Mumbai-Indians-IPL

मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करत चेन्नईची टर उडवणारा 'हा' पठ्ठ्या आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

Photo Courtesy: Twitter/@ICC

जेव्हा बरोबर २४ वर्षांपूर्वी शारजाहच्या मैदानावर अवतरले होते 'सचिन' नावाचे तुफान

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.