इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामाचा सुरुवात शानदार झाली असून हंगामात रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. शनिवारी(९ एप्रिल) डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवण्यात आला. यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये चेन्नईला हैदराबादने ८ विकेट्सने पराभूत केले. दूसरा सामना मुंबई इंडियन्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये पूण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये आरसीबीने मुंबईला ७ विकेट्सने पराभूत केले. यानंतर देखील मुंबईसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
या सामन्यांनंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला असून चेन्नई दहाव्या तर मुंबई नवव्या क्रमांकावर आले आहे. दोन्ही संघांनी ४ सामने पराभूत झाले असले, तरी गुणतालिकेत मुंबई चेन्नईच्यावर आहे. मुंबईने आयपीएलच्या १५ व्या हंगामात ४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही.
मुंबई शून्य पाॅइंट्स आणि -१.१८१ नेट रन रेटसह गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे, तर चेन्नई गुणतालिकेत -१.२११ नेट रनरेट आणि शून्य पाॅइंट्ससह दहाव्या क्रमांकावर आहे. नेट रनरेटच्या फरकामुळे चेन्नई मुंबईच्या खाली आहे. मुंबईने आत्तापर्यंत ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, तर चेन्नईने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. या हंगामात दोन्ही संघाला खराब फाॅर्मचा सामना करावा लागत आहे.
चेन्नईला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ६ विकेट्सने पराभूत केले, तर दूसऱ्या सामन्यात संघाला लखनऊने ६ विकेट्सने पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात पंजाबने सीएसकेला ५४ धावांनी पराभूत केले, तर चौथ्या सामन्यात हैदराबादने संघाला ८ विकेट्सने पराभूत केले.
मुंबईला पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्सने पराभूत केले, दूसऱ्या सामन्यात राजस्थानने २३ धावांनी पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात कोलकाताविरुद्ध संघ ५ विकेट्सने अपयशी ठरला. चौथ्या सामन्यात आरसीबीविरुद्ध संघ ७ विकेट्सने अपयशी ठरला. मुंबईने या हंगामाच्या लिलावापूर्वी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराहला संघात रिटेन केले होते. त्यानंतर लिलावात संघाने इशान किशनवर सर्वाधिक बोली लावत विकत घेतले होती. त्याच्यावर मुंबईने १५.२५ कोटी बोली लावली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: विराट कोहलीने ५५० चौकार तर २०० षटकार पुर्ण, ठरला अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
आयपीएलच्या मध्यात हर्षल पटेलवर कोसळला दुःखाचा डोंगर; मायेचा आधार कायमचा हरपला
IPL2022| कोलकाता वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!