पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात रविवारी (१६ एप्रिल) डबल हेडर म्हणजेच दोन सामने खेळवण्यात येणार आहे. रविवारी पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान होणार आहे. तसेच दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये होणार आहे. गुजरात विरुद्ध चेन्नई सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. त्यापूर्वी संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी फँटेसी ११ असू शकते याचा आढावा घेऊ.
असा असू शकतो गुजरात टायटन्सचा संभावित संघ
यंदा आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) सर्वात दमदार कामगिरी करणारा संघ म्हणजे गुजरात टायटन्स आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या ५ पैकी ४ सामन्यांत विजय मिळवले आहेत. आता त्यांना सहावा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी गुजरातच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (GT Predicted XI) विचार करायचा झाल्यास मागील काही सामन्यांप्रमाणेच मॅथ्यू वेड आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजी करू शकतात.
मधल्या फळीत विजय शंकर, डेव्हिड मिलर, कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya), अभिनव मनोहर आणि अष्टपैलू राहुल तेवातिया असू शकतात. तसेच गोलंदाजी राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, यश दयाल महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.
गुजरात टायटन्सचा संभावित संघ – मॅथ्यू वेड, शुबमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, कर्णधार हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, राहुल तेवातिया, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, यश दयाल.
असा असू शकतो चेन्नई सुपर किंग्सचा संभावित संघ
आयपीएलच्या १५ व्या हंगामात पहिले चार सामने पराभूत झाल्यानंतर पाचव्या सामन्यात विजयी मार्गावर परतलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघासमोर आता गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या या सामन्यासाठी संभावित ११ जणांच्या (CSK Predicted XI) संघाचा विचार करायचा झाल्यास मोठा बदल दिसण्याची शक्यता कमी आहे.
चेन्नईकडून रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड हे सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतात. तसेच मधल्या फळीत अष्टपैलू मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी खेळताना दिसू शकतात. तसेच कर्णधार रविंद्र जडेजाही अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावताना दिसेल. त्याचबरोबर ड्वेन ब्रावोही संघात असू शकतो. तर गोलंदाजीत ख्रिस जॉर्डन, महिश तिक्षणा आणि मुकेश चौधरी यांना संधी दिली जाऊ शकते.
चेन्नई सुपर किंग्सचा संभावित संघ – रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, महिश तिक्षणा, मुकेश चौधरी.
असा असू शकतो ड्रीम ११
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात होणाऱ्या सामन्यातील ड्रीम ११ (Dream XI) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास एमएस धोनीला संधी देऊ शकतो. यानंतर फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, शुबमन गिल आणि अभिनव मनोहर यांना संघात सामील करू शकतो. याव्यतिरिक्त अष्टपैलू म्हणून आपण रवींद्र जडेजा, राहुल तेवतिया आणि हार्दिक पंड्यावर विश्वास ठेवू शकतो. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर मोहम्मद शमी, राशिद खान आणि महिश तिक्षणा चांगले पर्याय ठरू शकतात. या फँटसी ११ चा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या, तर शिवम दुबेच्या खांद्यावर उपकर्णधाराची जबाबदारी सोपवू शकता.
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (GT vs CSK) ड्रीम ११
कर्णधार – हार्दिक पंड्या
उपकर्णधार – शिवम दुबे
यष्टीरक्षक – एमएस धोनी
फलंदाज – रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, शुबमन गिल, अभिनव मनोहर
अष्टपैलू – रवींद्र जडेजा, राहुल तेवतिया, हार्दिक पंड्या
गोलंदाज – मोहम्मद शमी, राशिद खान, महिश तिक्षणा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार रोहितने मुंबईच्या ६ व्या पराभवानंतर चूक केली मान्य; म्हणाला, ‘मी पूर्ण जबाबदारी घेतो…’
‘टीम इंडियात पुनरागमनासाठी काहीपण’, दिनेश कार्तिकने ठोकली दावेदारी
IPL2022| पंजाब वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!