मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील (IPL 2022) चौथा सामना सोमवारी (२८ मार्च) गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या नव्या संघात झाला. हा दोन्ही संघांचा आयपीएलमधील पहिलाच सामना होता. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
हार्दिक (Hardik Pandya) या सामन्यादरम्यान पहिल्यांदाच कर्णधाराच्या भूमिकेत दिसून आला. या सामन्यासाठी गुजरातने अंतिम ११ जणांच्या संघात मॅथ्यू वेड, डेव्हिड मिलर, राशिद खान आणि लॉकी फर्ग्यूसन या चार परदेशी खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. गुजरातकडून अभिनव मनोहर पदार्पण करत आहे.
तसेच केएल राहुल (KL Rahul) कर्णधार असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने क्विंटॉन डी कॉक, एव्हिन लुईस, दुष्मंथा चमिरा या तीन परदेशी खेळाडूंना अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे. या सामन्यात पंड्या बंधूंवर सर्वांचेच लक्ष होते, कारण पहिल्यांदाच कृणाल आणि हार्दिक हे पंड्या बंधू वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून खेळताना दिसले.
A look at the Playing XI for #GTvLSG
Live – https://t.co/u8Y0KpnOQi #GTvLSG #TATAIPL https://t.co/IwRUSZE08H pic.twitter.com/uZfpKEI8A8
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
असे आहेत अंतिम ११ जणांचे संघ (GT vs LSG Playing XI) –
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार), क्विंटॉन डी कॉक (यष्टीरक्षक), एव्हिन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मोहसीन खान, आयुष बडोनी, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान
गुजरात टायटन्स – शुबमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण ऍरॉन, मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या –
लखनऊविरुद्ध मैदानात उतरणार केवळ ‘फलंदाज’ हार्दिक पंड्या, गुजरातच्या प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया
आयपीएलमध्ये ‘या’ बाबतीत पंजाबच किंग, सीएसकेलाही पछाडलंय; तर शिखर ठरलाय वॉर्नरला भारी