हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या आत्तापर्यंत एकाच संघात खेळले आहेत. मात्र, सोमवारी (२९ मार्च) आयपीएलच्या १५व्या हंगामातील चौथ्या सामन्यात हे भावंडं पहिल्यांदाच आमने- सामने आले. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिकची विकेट लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू कृणालने घेतली. भावाची विकेट घेतल्यानंतर कृणाल गप्प राहिला खूप काही बोलून गेला. हार्दिकच्या विकेटवर मोठ्या भावाच्या प्रतिक्रियेवरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. आता याप्रकरणी हार्दिकच्या बाजूनेही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
सामन्यानंतर हार्दिकला (Hardik Pandya) याबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. तुमच्या मोठ्या भावाची विकेट घेतल्यावर तुम्हाला स्लेजिंगला सामोरे जावे लागले असे हर्षा भोगले यांनी विचारले. यावर मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू म्हणाला, “जेव्हा कृणालने माझी विकेट घेतली असती आणि आम्ही हरलो असतो, तेव्हा मला आणखीन ट्रोल केले गेले असते. आता सर्वकाही ठीक आहे. त्याने माझी विकेट घेतली आणि आम्ही जिंकलो. कुटुंब आनंदी आहे.”
"The family is neutral and happy," @hardikpandya7 on the mini battle between the Pandya brothers 😀😀#TATAIPL #GTvLSG pic.twitter.com/FlspapmnRK
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
हार्दिक आणि कृणाल गेल्या हंगामापर्यंत मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) एकाच संघात खेळत होते. आयपीएलमध्ये दोन्ही भाऊ पहिल्यांदाच आमने-सामने आले. शॉट मारण्याच्या प्रयत्नात हार्दिक त्याच्या भावाच्या चेंडूवर झेलबाद झाला. यानंतर कृणालने गप्प बसून त्याला मजेशीर पद्धतीने स्लेज केले. या दरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२२चा चौथा सामना गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये सोमवारी (२८ मार्च) झाला. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या संघाने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात राहुल तेवतियाने २४ चेंडूत नाबाद ४० धावा करत गुजरातचा संघाचा विजय निश्चित केला. हार्दिकने ३३ धावा केल्या, तर मॅथ्यू वेडने ३० आणि डेविड मिलरने ३० धावा केल्या. तसेच मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हाव इज द ‘जोस’! छोटेखानी ३५ धावांच्या खेळीसह बटलरच्या शिरपेचात नवा विक्रम; सचिन, मार्शच्या यादीत उडी
भारत विश्वचषकातून बाहेर, पण आयसीसीच्या वनडे क्रमवारीत खेळाडूंची मोठी झेप; कर्णधार मितालीही फायद्यात