---Advertisement---

कर्णधारपदाच्या जबाबदारीचं शिवधनुष्य लिलया पेलतोय हार्दिक पंड्या; म्हणाला, ‘यामुळे खेळाडू…’

On: शनिवार, एप्रिल 9, 2022 11:16 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आयपीएल २०२२मध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाचे नेतृत्व करत आहे. गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिकने संघाला त्याचे पहिले तिन्ही सामने जिंकवून दिले आहेत. यादरम्यान हार्दिकचे वैयक्तिक प्रदर्शन देखील सुधारल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (०८ एप्रिल) पंजाब किंग्जला ६ विकेट्सने धूळ चारल्यानंतर गुणतालिकेत त्यांचा संघ दुसऱ्या स्थानावर आला आहे. हार्दिकच्या मते अतिरिक्त जबाबदारी आणि आव्हाने तुम्हाला एक चांगला क्रिकेटपटू बनवतात.

गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिक पंड्या (Hardik Pandya) फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगले योगदान देत आहे. तो आता त्याचा चार षटकांचा कोटाही यशस्वीरित्या पूर्ण करत आहे, जे मागच्या हंगामात त्याला जमले नव्हते. पंजाब किंग्जविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पंड्या म्हणाला की, “मी कर्णधारपदाचा आनंद घेत आहे. क्रिकेटरच्या रूपात नेहमीच जबाबदारी हवी होती आणि हेच कारण आहे की, मी चांगला क्रिकेटपटू बनत आहे. कारण, आव्हानांचा सामना केल्यामुळे तुम्हाला अधिक उत्कृष्ट बनता. विजय असो किंवा पराभव आमचा संघ तटस्थ राहण्याचा प्रयत्न करतो, आम्ही आमच्या पराभवाचाही आनंद साजरी करतो. कारण, तो खूप महत्वाचा असतो. त्यामुळे तुमच्या विजयाचे महत्व वाढते.”

युवा शुबमन गिलने पंजाब किंग्जविरुद्ध ५९ चेंडूत ९६ धावा केल्या होत्या. तसेच, मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने ८४ धावा केल्या होत्या. याविषयी बोलताना पंड्या म्हणाला, “शुबमन खूप जबाबदारी घेत आहे आणि हे त्याच्या फलंदाजीत दिसत आहे. त्याला माहिती आहे की, तो फ्रँचायझीसाठी किती महत्वाचा आहे आणि मागच्या दोन सामन्यात त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, ती पाहता माझ्याकडे त्याला बोलण्यासाठी काहीच नाहीये.” यावेळी हार्दिक पंड्याने फिरकीपडू राशिद खानला स्वतःचा ‘हुकमी एक्का’ सांगितले. हार्दिकच्या मते राशिद अडचणीच्या काळात संघाच्या कामी येतो.

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ९ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्स शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. विजयासाठी गुजरातला शेवटच्या २ चेंडूत १२ धावांची आवश्यकता होती आणि स्ट्राईकवर होता राहुल तेवतिया. ओडियन स्मिथने टाकलेले शेवटचे दोन्ही चेंडू तेवतियाने सीमारेषेपार पाठवले आणि गुजरातला हंगामातील सलग तिसरा विजय मिळवून दिला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘भुवनेश्वर आता विकेट घेणारा गोलंदाज नाही राहिला’, अनुभवी गोलंदाजांवर माजी क्रिकेटरकडून टीका

RCB vs MI: बेंगलोरचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; दोन्ही संघात धडाकेबाज खेळाडूंची एन्ट्री

तीन असे खेळाडू ज्यांनी बंदीनंतरही आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन करत दाखवला दम; जडेजाचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---