इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४८वा सामना पंजाब किंग्जने जिंकला. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचा हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सचा मोठी धावसंख्या करता आली नाही आणि परिणामी त्यांना पारभव स्वीकारावा लागला. गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल अपयशी ठरल्यामुळे देखील संघाला मोठी धावसंख्या करत आली नाही. पंजाबच्या ऋषी धवनच्या डायरेक्ट हिटमुळे त्याने अवघ्या ९ धावा करून विकेट मागवली.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिकच्या या निर्णयानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आणि दिग्गजांची शंका खरी ठरली. प्रथम फलंदाजी करताना हार्दिकचा संघ ८ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या १४३ धावा करू शकला. प्रत्युत्तर पंजाब किंग्जने २ विकेट्सच्या नुकसानावर आणि १६ विकेट्सच्या नुकसनावर लक्ष्य गाठले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गुजरातच्या डावातील तिसऱ्या षटकात संदीप शर्मा गोलंदाजीसाठी आला होता. यावेळी खेळपट्टीवर शुबमन गिल (Shubman Gill) होता. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्याच्या नादात गिल धावबाद झाला. ऋषी धवन (Rishi Dhawan) याने मारलेल्या उत्कृष्ट डायरेक्ट थ्रोमुळे त्याने स्वस्तात विकेट गमावली. गिलने केलेल्या ९ धावांसाठी त्याला ६ चेंडू खेळावे लागले आणि यामध्ये दोन चौकार देखील ठोकले. गिल धावबाद झाल्यानंतर मात्र नाखुश दिसला कारण गोलंदाज संदीप शर्मा धावताना त्याच्या वाटेत आला होता. असे असले, तरी नियमाप्रमाणे संदीपची काहीच चूक निघाली नाही. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Biscuit8Chai/status/1521505308798971905
शुबमन गिलच्या रूपात पहिला झटका लागल्यानंतर गुजरातसाठी वरच्या फळीतील साई सुदर्शनने सर्वाधिक ६५ धावांचे योगदान दिले आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला. त्याव्यतिरिक्त गुजरातचा एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही. पंजाबचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने ३३ धावा खर्च करून ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात १४४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाब किंग्जने ४ षटके शिल्लक ठेऊन विजय मिळवला. लियाम लिविंगस्टोनने अवघ्या १० चेंडूत ३० धावा कुटल्या आणि संघाला लवकर विजय मिळवून दिला. सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक ६२ धावा केल्या आणि लिविंगस्टोनसोबत शेनवटपर्यंत नाबाद राहिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातच्या ‘टायटन्स’वर भारी पडले पंजाबचे ‘किंग्स’, ८ विकेट्सने टेबल टॉपरला चारली धूळ
‘दोघेही मोठे ब्रँड’, पीटरसनने ‘या’ कारणामुळे रोनाल्डोशी केली विराटची तुलना, जाणून घ्या कारण
गुजरात टायटन्सव्यतिरिक्त प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा दम असणारे तीन संघ, कारणही आहे तितकंच खास