---Advertisement---

ग्लेन मॅक्सवेलने पकडला लाखात एक झेल! हवेत झेपावत एका हाताने घेतला शुबमनचा ब्लाइंडर कॅच

On: गुरूवार, मे 19, 2022 10:36 PM
Glenn-Maxwell-Catch
---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात गुरुवारी (१९ मे) गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर एकमेकांसोबत भिडले. उभय संघातील या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी केली. गुजरातच्या डावाची सुरुवात सलामीवीर शुबमन गिल चांगली करू शकला नाही. आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलने एक उत्कृष्ट झेल पकडला आणि गिलला स्वस्तात बाद केले. हा झेल घेतल्यानंतर मॅक्सवेलचे सर्वत्र कौतुक केले गेले.

आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड (Josh Hazelwood) डावाच्या तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आला होता. हेजलवुडच्या कोट्यातील हे पहिलेच शतक होते. सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. स्लिप्समध्ये उभा असलेल्या मॅक्सवेलने चपळाई दाखवल्यामुळे गिल अवघी एक १ धाव करून तंबूत परतला. गिलने हा चेंडू डिफेंड करण्याचा प्रयत्न केला, पण हेजलवूडचा चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळला.

गिलला चेंडून अंदाज नीट आला नाही आणि तो बॅटच्या बाहेरच्या कोपऱ्यावर लागून थेड मॅक्सवेलच्या हातात गेला. त्यानेही उजव्या दिशेला अचूक डाईव्ह मारली आणि एका हातात चेंडू पकडला. ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) हा झेल घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून मॅक्सवेलचे तोंड भरून कौतुक केले जात आहे.

https://twitter.com/skipper_kohli/status/1527291441378377730?s=20&t=nKqBdD9KfcVq_gMW9rAvlQ

https://twitter.com/IPL/status/1527299349129986050?s=20&t=TFpOwF2croBZVVIXeyS1tA

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर गुजरात टायटन्सने प्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने मर्यादित २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. यामध्ये त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक ६२ धावांचे योगदान दिले. या धावा करण्यासाठी हार्दिकने ४७ चेंडू खेळले, ज्यामध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने या धावा केल्या.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1527291034757001217?s=20&t=9ThHxLO7au-7QSMlpemAwQ

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1527291480577978373?s=20&t=i_k0Uo25cvjU_5t_OgcjeA

गुजरातचा सालमीवीर रिद्धिमान साहाने २२ चेंडूत ३१ धावा केल्या. तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या डेविड मिलरने. आरसीबीसाठी वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडने चार षटकात ३९ धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि वानिंदू हसरंगाने प्रत्येकी एक-एक विकेट नावावर केली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

हेल्मेट फेकलं, बॅट आपटली; अंपायरच्या निर्णयावर नाखुश मॅथ्यू वेडची ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड

खेळाडूमुळे नव्हे तर पंचांमुळे केकेआरने गमावली लखनऊविरुद्धची मॅच? रिंकू सिंगबाबत दिला चुकीचा निर्णय

केकेआरला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवणारा रिंकू सिंग पराभवानंतर भावूक, फोटो तोडेल तुमचेही हृदय!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---