रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली गुरुवारी (१९ मे) गुजरात टायटन्सचा वरच्या फळीतील फलंदाज मॅथ्यू वेडला धीर देताना दिसला. मॅथ्यू वेड या सामन्यात पायचीत झाला, पण पंचांच्या निर्णयाशी तो सहमत दिसला नाही. डीआरएस घेतल्यानंतर अल्ट्राएड्ज तंत्रज्ञानावर देखील वेडने शंका व्यक्त केल्याचे दिसले.
आयपीएल २०२२ चा ६७ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असा खेळला गेला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शुबमन गिल अवघी एक धाव करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर मॅथ्यू वेड (Matthew Wade) फलंदाजीसाठी आला, पण तो देखील मोठी खेळी करू शकला नाही.
गुजरातच्या डावातील ६ व्या षटकात वेडने विकेट गमावली. ग्लेन मॅक्सवेल या षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील दुसरा चेंडू वेडच्या पॅडला लागला आणि आरसीबीच्या खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली. पंचांनी क्षणाचाही विलंब न करता वेडला बाद करार दिला. परंतु वेडने देखील पूर्ण आत्मविश्वासासह डीआरएस घेतो. डीआरएसनंतर तिसरे पंच वेडला बाद करार केले, पण त्यांच्या या निर्णयाशी तो सहमत नव्हता.
मॅक्सवेलने टाकेलला हा चेंडू वेडच्या पॅडला लागला, पण त्याआधी तो बॅटला लागल्यासारखे वाटले होते. वेडला स्वतःच याविषयी विश्वास होता की, चेंडू पॅडला लागण्याआधी बॅडला घासून गेला आहे. डीआरएस पाहिल्यानंतर मात्र त्यात चेंडू आणि पॅडचा कसलाही संपर्क दिसला नाही. अल्ट्राएड्ज तंत्रज्ञानात चेंडू थेट पॅडला लागल्यानंतर हालचाल दिसली. याच कारणास्तव विकेट गमावल्यानंतर तो परत जात असताना रागाने लाल झाला होता. अशातच विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या जवळ जाऊन सांत्वन करताना दिसला. विराटच्या या खेळाडू वृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.
Virat Kohli had some words with Matthew Wade after he got. pic.twitter.com/yAyQ2FxbLz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2022
It Feels Sad with The Umpires Decision In Wade , But It's Not A Fixed Match, If That Was So, Then Kohli Had Been In The Place Of Wade Many Times And Got Cheated By The Umpires pic.twitter.com/b0yYQKiUx3
— ❣️MR😇ChEeKu💞❣️ (@loyal18viratian) May 19, 2022
Virat Kohli shared the pain of dodgy DRS decisions as Matthew Wade was at receiving end tonight. #IPL pic.twitter.com/IUmEdEEmcE
— CBTF Speed News (@cbtfspeednews) May 19, 2022
Virat Kohli to Matthew Wade:
FIRST TIME😅 #ViratKohli#gtvsrcb
📸: Disney+Hotstar pic.twitter.com/TPa1AHggiO pic.twitter.com/TGEUHbNlzK— Jay shree Ram ❤️ (@PankajS19632479) May 19, 2022
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. यामध्ये कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक ६२ धावांचे योगदान दिले. तर आरसीबीसाठी वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने ३९ धावा खर्च करून सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ग्लेन मॅक्सवेलने पकडला लाखात एक झेल! हवेत झेपावत एका हाताने घेतला शुबमनचा ब्लाइंडर कॅच
हेल्मेट फेकलं, बॅट आपटली; अंपायरच्या निर्णयावर नाखुश मॅथ्यू वेडची ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड
शॉकिंग! लाईव्ह सामन्यातच ३८ वर्षीय स्टार बॉक्सरला हृदयविकाराचा झटका, जागीच गमावले प्राण