इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा चौथा सामना यावर्षी नव्याने उतरलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांमध्ये खेळला गेला. चाहत्यांसाठी हा सामना खास होता कारण या सामन्यात हार्दिक पंड्या दिर्घ काळानंतर खेळताना दिसणार होता. या सामन्यात हार्दिकने ४ षटके गोलंदाजी केली, तसेच फलंदाजीतसुद्धा त्याने चांगली कामगिरी केली आणि २८ चेंडूत ३३ धावा केल्या. यामध्ये एका षटकाराचा आणि पाच चौकारांचा समावेश आहे. लखनऊने दिलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघ पराभवाच्या दिशेने चालला होता. परंतु, राहुल तेवातिया आणि अभिनव मनोहरने डाव सांभाळत सामना जिंकण्यास मोठे योगदान दिले.
या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, “आम्हा सर्वांना शिकण्यासाठी हा योग्य सामना होता. परंतु, विजयासह खूप काही शिकलो. शमी वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याने चांगली सुरुवात करुन दिली. आम्ही कोणत्याही दिवशी या मैदानात १६० चा धावा करु शकतो. मी जास्तीत जास्त चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेन, कारण मला माझ्या अनुभवाने दबाव बनवायचा आहे, त्यामुळे दुसऱ्यांना खुल्यापणाने खेळता यावे. आम्हाला एक संघ म्हणून खेळायचे आहे आणि कोणीही आपल्या जबाबदारीपासून दूर जाऊ शकत नाही.”
तो पुढे शमीबाबात बोलताना म्हणाला, “आज मैदानात खूप आर्द्रता होती. त्यामुळे मी सुरुवातीला शमीकडून पूर्ण षटके टाकून घेऊ शकलो नाही. युवा फलंदाज अभिनव सदारंगानीकडे एक चांगली प्रतिभा आहे. त्याने हे दाखवून दिले आहे की, तो भविष्यात चांगले खेळेल. तसेच राहुल तेवतिया सुद्धा चांगला खेळला. जर आम्ही हरलो असतो, तर मला कृणालकडे जाण्यास त्रास झाला असता. परंतु आता कुटुंब खुश आहे. त्याने मला बाद केले आणि आम्ही सामना जिंकलो.”
तेवातियाने २४ चेंडूत ४० धावा केल्या. तसेच अभिनव मनोहरने ७ चेंडूत १५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. हार्दिकने ३३ धावा केल्या तर मॅथ्यू वेडने ३० धावा केल्या. संघाचा पुढील सामना २ एप्रिलला दिल्ली संघाविरुद्ध पार पडणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियन महिला ९ व्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये, वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये पराभूत
Video: विटांच्या वेगवेगळ्या रचना करताना दिसला चेन्नई संघ, धोनी-जडेजाचाही उपक्रमात सहभाग
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल बेंगलोर वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही