---Advertisement---

भर मैदानात इंच टेप घेऊन हार्दिक मोजू लागला रनअप, राजस्थानचे फलंदाज असहाय्य होऊन बसले बघत

On: शुक्रवार, एप्रिल 15, 2022 4:20 PM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला सामना रोमांचक राहिला. गुजरातने ३७ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही योगदान दिले. मात्र आपल्या प्रदर्शनाखेरीज तो इतर गोष्टीमुळेही चर्चेत राहिला. हार्दिकला गोलंदाजी करताना खेळपट्टीवरील गोलंदाजीसाठीच्या खुणेबद्दल शंका उपस्थित झाली होती, ज्यामुळे तो चक्क इंच टेप घेऊन खेळपट्टीचे माप घेताना दिसला आहे.

तर झाले असे की, गुजरातच्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ (RR vs GT) ९ षटकांनंतर ४ बाद ८२ धावांवर होता. पुढे हार्दिक (Hardik Pandya) दहावे षटक टाकण्यासाठी आला होता. परंतु तो गोलंदाजीला येताच गोंधळलेला दिसला. त्याला खेळपट्टीवरील आपली गोलंदाजीची खुणच सापडत नव्हती. त्यामुळे नेकमा कोठून रनअप घ्यावा?, याचा अंदाज त्याला घेता येत नव्हता. 

बरेचशा खुणा केल्यानंतर हार्दिक शेवटी थकला आणि त्याने रनअप मोजण्यासाठी डगआऊटकडे इशारा केला. हार्दिकच्या इशाऱ्यानंतर डगआऊटमधून इंच टेप मागवण्यात (Hardik Pandya Measuring Tape Mid Game) आला. सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य इंच टेप घेऊन मैदानात आल्यानंतर त्या सदस्याच्या साहाय्याने हार्दिक रनअप मोजण्यासाठी मदत घेतो. एकीकडे हार्दिक त्याच्या गोलंदाजीची समस्या मिटवण्यासाठी रनअप मोजत असताना दुसरीकडे राजस्थानचे फलंदाज मात्र असहाय्य होऊन त्याला पाहात राहिले. यादरम्यान काही वेळ खेळही थांबवण्यात आला. 

https://www.instagram.com/reel/CcV9kTBlbwP/?utm_source=ig_web_copy_link

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

राजस्थानच्या डावात हार्दिकने केवळ २.३ षटके गोलंदाजी केली. कारण सुरुवातीला फलंदाजी करताना तो बराच वेळ मैदानावर होता. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत डावाखेर नाबाद ८७ धावा फटकावल्या होत्या. ज्यामुळे त्याच्या पायामध्ये क्रॅम्प आला होता. यामुळेच तो जास्त गोलंदाजी करू शकला नाही. २.३ षटके टाकताना त्याने १८ धावा दिल्या आणि १ विकेट घेतली. त्यानंतर तो अचानक मैदान सोडून बाहेरही गेला होता.

गंभीर नाही दुखापत – हार्दिक पंड्या
सामन्यानंतर आपल्या दुखापतीविषयी अपडेट देताना हार्दिक म्हणाला, ‘हा विजय खूप खास होता. मला केवळ क्रॅम्प आला होता, ही दुखापत फार गंभीर नाही. मी मागच्या सामन्यात १५ षटके आणि या सामन्यात १७ षटके फलंदाजी केली. कदाचीत त्याचमुळे हा क्रॅम्प आला असावा. मला इतकावेळ फलंदाजी करण्याची सवय नाही.’

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

Video: हार्दिक पंड्याचा बुलेट थ्रो अन् सॅमसन थेट तंबूत! स्टंपचेही तुकडे झाल्याने काही वेळासाठी सामनाही थांबला

बडे दिलवाला जोस! ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हार्दिक पुढे निघून गेल्यानंतर बटलरने असे काही करत जिंकली मने

कोलकाता-चेन्नईच्या ‘या’ खेळाडूंचा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून सन्मान, मिळाले मोठे पुरस्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---