इंडियन प्रीमियर लीगचा विचार करायचा झाला तरी, अनेकांच्या डोळ्यासमोर षटकार-चौकारांचा पाऊस दिसतो. आयपीएलमध्ये आक्रमक फलंदाजी नेहमीच पाहायला मिळाली आहे. अनेक खेळाडू मोठमोठे फटके मारण्याचा या स्पर्धेदरम्यान प्रयत्न करताना दिसतात. आयपीएल २०२२ चा हंगामही याला अपवाद ठरलेला नाही. या हंगामात सर्वाधिक आक्रमक फलंदाजी झाल्याचीच आकडेवारी समोर येत आहे.
हंगामात सर्वाधिक षटकार
आयपीएल २०२२ हंगामामध्ये (IPL 2022) १५ मेपर्यंत ६३ सामने खेळले गेले आहेत. या ६३ सामन्यांमध्ये तब्बल ८८५ षटकार सर्व संघांनी मिळून मारले आहेत. त्यामुळे आयपीएल २०२२ हंगामात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक षटकार (Most Sixes in an IPL Season) मारण्यात आले आहेत. यापूर्वी २०१८ साली ८७२ षटकार मारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आयपीएल २०२२ मध्ये अद्याप ११ सामने बाकी आहेत. त्यामुळे या हंगामात १००० षटकारही पूर्ण होण्याचा पराक्रम होऊ शकतो.
आयपीएलच्या या १५ व्या हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ नव्याने सामील झाले आहेत. त्यामुळे यंदा १० संघ खेळत असल्याने सामन्यांची संख्याही ६० वरून ७४ अशी वाढली आहे. याआधी जवळपास २०१४ पासून २०२१ पर्यंत प्रत्येक हंगामात ८ संघ खेळत असल्याने साधारण ६० सामनेच झाले होते. त्यामुळे आयपीएलच्या १५ व्या हंगामात मागील हंगामापेक्षा षटकारांची संख्या वाढणे जवळपास साहजिकच होते.
जोस बटलरने मारलेत सर्वाधिक षटकार
साल २०२२च्या आयपीएल हंगामाचा विचार करायचा झाल्यास ६३ सामन्यांनंतर सर्वाधिक षटकार (Most Sixes) मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर (Jos Buttler) अव्वल क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत ३७ षटकार खेचले आहेत. त्याच्यापाठोपाठ कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) आहे. त्याने ३२ षटकार मारले आहेत. या दोघांनीच आत्तापर्यंत या आयपीएल हंगामात ३० हून अधिक षटकार मारले आहेत.
संघांचा विचार करायचा झाल्यास राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सर्वाधिक ११२ षटकार ठोकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सने १०० षटकार ठोकलेत. आत्तापर्यंत या दोन संघांचेच १०० षटकार पूर्ण झाले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो निर्णय चूकला’, गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर ‘कॅप्टनकूल’ धोनीने मान्य केली चूक
अँड्र्यू सायमंड्सला ‘रॉय’ का म्हणतात तरी का? रोचक आहे कारण
गुजरातचे शानदार नेतृत्व करण्याचे श्रेय मुंबई इंडियन्सचे? पाहा काय म्हणतोय हार्दिक पंड्या