---Advertisement---

ऐकलंत का? १७ कोटींनीही नाही भरलं केएल राहुलचं मन, अर्ध्या हंगामात केली पगार वाढीची मागणी!

On: गुरूवार, मे 19, 2022 7:25 PM
KL-Rahul
---Advertisement---

आयपीएल २०२२ मध्ये केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्सने जबरदस्त प्रदर्शन करून प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. लखनऊ सुपर जायंट्सने राहुलला मेगा लिलावापूर्वी १७ कोटी रुपयांमध्ये ड्राफ्ट केले होते. मागच्या हंगामापर्यंत तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता, त्याठिकाणी त्याला ११ कोटी रुपये मिळत होते. चालू हंगामातील तो सर्वात जास्त मानधन मिळणारा खेळाडू असला, तरी केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर त्याने मानधन वाढवण्याची मागणी केली.

बुधवारी (१८ मे) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी धमाकेदार प्रदर्शन केले. लखनऊने एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या. प्ररत्युत्तरात केकेआरच्या फलंदाजांनी देखील शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली, पण अखेरीस दोन धावा कमी पडल्यामुळे त्यांनी पराभव स्वीकारला.

केएल राहुलने या सामन्यात ५१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. तर क्विंटन डी कॉकने तब्बल २०० च्या स्ट्राईक रेटने ७० चेंडूत १४० धावा केल्या. राहुलच्या मते अशा थरारक सामन्यासाठी खेळाडूंना अधिक मानधन मिळाले पाहिजे. सामना संपल्यानंतर राहुल गंमतीत म्हणाला की, “मला अशा सामन्यांसाठी शक्यतो अधिक मानधन दिले पाहिजे. आम्ही या हंगामात अशा प्रकारच्या सामन्यांना मुकलो आहोत. खूप सामने असे नव्हते, जे शेवटच्या चेंडूपर्यंत गेले असतील, यामध्ये काही असेही असतील, जे शेवटच्या षटकापर्यंत गेले होते.”

राहुलने सांगितल्याप्रमाणे या घासून झालेल्या सामन्यात खेळाडूंना खूप काही शिकायला मिळाले. तो म्हणाला की, “टाईमआऊटच्या वेळी फक्त एवढीच चर्चा होती की, तुम्ही तुमचा सर्वोश्रेष्ठ चेंडू टाकण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आम्ही रणनीतीवरून भटकलो, फलंदाजांसाठी खेळणे सोपे झाले. हा आमच्यासाठी चांगला धडा होता. अशा विजयामुळे संघाला एकत्र ठेवण्यासाठी मदत मिळते.”

दरम्यान, केकेआरला धुळ चारल्यानंतर लखनऊ संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. याचसोबत आता केएल राहुलच्या नेतृत्वावर नेहमी उपस्थित केले जाणारे प्रश्न देखील काही प्रमाणात कमी होतील. यापूर्वी राहुलच्या नेतृत्वात पंजाब किंग्जला एकदाही प्लेऑफमध्ये पोहोचला नव्हता, पण लखनऊला मात्र त्याने पहिल्याच हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

केकेआरला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवणारा रिंकू सिंग पराभवानंतर भावूक, फोटो तोडेल तुमचेही हृदय!

खेळाडूमुळे नव्हे तर पंचांमुळे केकेआरने गमावली लखनऊविरुद्धची मॅच? रिंकू सिंगबाबत दिला चुकीचा निर्णय

आरसीबीसाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती, प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी ‘हा’ आहे उपाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---