इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्याने २ संघ सामील झाले होते. ते संघ म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स, गुजरात आणि लखनऊ दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. मात्र, एक संघ अंतिम सामन्यात धडक मारू शकला, तर दुसरा सामना प्लेऑफ फेरीत जाऊन एलिमिनेटर सामन्यातून बाहेर पडला. बाहेर पडलेला संघ म्हणजेच लखनऊ होय. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून १४ धावांनी पराभूत व्हावे लागले. बेंगलोरने सामना जिंकल्यानंतर आता यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) म्हणाला की, या सामन्यादरम्यान लखनऊ संघ आव्हानाचा पाठलाग करत होता. त्यावेळी त्यांचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याची विकेट सर्वात महत्त्वाची होती. कार्तिकच्या म्हणण्यानुसार, राहुल क्रीझवर टिकला असता, तर तो आपल्या संघाला सामना जिंकून देण्यात यशस्वी ठरला असता.
‘केएल राहुलची विकेट सर्वात महत्त्वाची’
केएल राहुल जोपर्यंत क्रीझवर होता, लखनऊच्या अपेक्षा जिवंत होत्या. मात्र, यष्टीमागे चौकार मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. यासोबतच संघालाही पराभवाचा सामना करावा लागला. कार्तिकने राहुलची विकेट सर्वात महत्त्वाची असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, “माझ्या मते केएल राहुलची विकेट सर्वात महत्त्वाची होती. कारण, त्याच्याकडे सामना पुढे नेण्याची क्षमता आहे. त्याचा गेम प्लॅन असा आहे की, तो शेवटपर्यंत फलंदाजी करतो आणि शेवटी तो आणखी धोकादायक बनतो. त्यावेळी त्याला थांबवणे खूप कठीण होते. कारण, त्याच्याकडे बरेच शॉट्स आहेत आणि तो खूप वेगाने गिअर्स बदलतो. माझ्या मते, वनिंदू हसरंगाने जबरदस्त क्षेत्ररक्षण केले आणि किमान १५-२० धावा वाचवल्या.”
सामन्याबद्दल थोडक्यात
बेंगलोरने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध शानदार विजय मिळवला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानात या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळण्यात आला. या सामन्यात फलंदाजी करताना बेंगलोर संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत २०७ धावांचा डोंगर उभारला होता. रजत पाटीदारने जबरदस्त शतक ठोकले आणि ५४ चेंडूत ११२ धावांची नाबाद खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला २० षटकात ६ विकेट्स गमावत १९३ धावाच करता आल्या. कर्णधार केएल राहुल याने सर्वाधिक ७९ धावा चोपल्या. मात्र, संघाला पराभूत व्हावे लागले.
महा स्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘चूका कर आणि लोकांसमोर अपयशी हो’, अश्विनला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिलेला अनोखा गुरूमंत्र
संजू सॅमसनला बेंगलोरच्या ‘या’ दोन गोलंदाजांपासून राहावं लागेल सावध, बनू शकतात राजस्थानचा काळ
मैदानात घुसलेल्या चाहत्याला पोलिसांनी थेट उचललं खांद्यावर, विराटही झाला चकीत; Video व्हायरल