इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील १४ वा सामना ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात युवा इशान किशनवर सर्वांचे लक्ष असणार आहे. तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग असला, तरी तो चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो. आता त्याने धोनीसोबतच्या एका किस्स्याचा खुलासा केला आहे.
इशान किशन म्हणाला तो कधी कधी एमएस धोनीच्या क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीने आश्चर्यचकित होतो. किशनच्या मते तो अजूनही धोनीचा खेळ समजण्याचा प्रयत्न करतो. आयपीएलच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर सर्वाधिक बोली लावत १५. २५ कोटींना विकत घेतले आहे.
आयपीएल २०२२ चा सर्वात महागडा ठरलेला इशान किशन म्हणाला, “मी नेहमीच हे माहित करुन घेण्याचा प्रयत्न करतो की, धोनी आपल्या खेळात आपल्या डोक्याचा कशाप्रकारे वापर करतो. तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही, आयपीएलच्या एका सामन्यात धोनीने मला सर्वात जास्त तनाव दिला.”
इशान म्हणाला, “मी त्या सामन्यामध्ये चांगला खेळलो होतो आणि खूप धावा केल्या होत्या. परंतु, तरीही धोनी गोलंदाज इमरान ताहिरकडे गेला आणि त्याला काहीतरी सांगितले. मी ऐकण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु, मला काही एकूच आले नाही. त्यानंतर धोनी भाईने त्याला काय सांगितले मला माहित नाही, पण ताहिरने मला एक चेंडू हाफ पिचवरचा टाकला, जो मी मोठी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात झेल दिला.”
तो म्हणाला, ‘आजपर्यंत मला हे समजले नाही की स्पिनरला ड्राइव करण्याच्या प्रयत्नात फलंदाज थर्ड मॅनला झेल कसा देऊ शकतो.’ इशान किशनने आयपीएल कारकिर्दीत ६३ सामन्यांत ३०.५२ च्या सरासरीने १५८७ धावा केल्या आहेत. त्याने २०२१ मध्ये भारताच्या टी२० आणि एकदिवसीय संघात पदार्पण केले आहे. तसेच धोनी आणि इशान हे दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट झारखंडकडून खेळलेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माकडे टी२०त दसहजारी मनसबदार बनण्याची संधी; ‘किंग’ कोहलीच्या यादीत मिळू शकते जागा
ऑस्ट्रेलियाचा विजयरथ सुसाट! पाकिस्तानविरुद्ध कसोटीनंतर आता टी२० मालिकाही केली नावावर