आयीएलमध्ये सर्वाधिक ५ वेळा विजेतेपद पटकावलेला संघ मुंंबई इंडियन्सने चालू हंगामातील त्यांचे पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला त्यांचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोबत खेळायचा आहे. या हंगामात मुंबईची फलंदाजी ठीक-ठाक राहिली आहे, पण गोलंदाज मात्र अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करताना दिसले नाहीत. पुढचा सामना खेळण्यापूर्वी मुंबईच्या खेळाडूंचा खास फोटोशूट केला गेला, ज्याचा व्हिडिओ फ्रँचायझीने शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला त्यांचा पुढचा सामना ९ एप्रिल (रविवार) रोजी खेळायचा आहे. त्यापूर्वी फ्रँचायझीने संघातील खेळाडूंनाचा फोटोशूटमध्ये सहभाग घ्यायला लावला. या फोटोशूटदरम्यान अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सलामीवीर फलंदाज ईशान किशनची फिरकी घेतली. फोटोशूटवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याची पत्नी रितिका सजदेह त्यांच्या मुलीसह उपस्थित होते. हे सर्वजण या व्हिडिओत दिसत आहेत. व्हिडिओत ईशान किशन (Ishan Kishan) त्याचे बायसेप्स दाखवताना दिसत आहे,
ईशान किशन कॅमेरामनशी बोलताना म्हणतो की, “नाही नाही! मसल याला म्हणतात, हे पाहा.” तितक्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) त्याठिकाणी येतो आणि म्हणतो, “याला मसल नाही फॅट म्हणतात. हातात देखील फॅट असते.”
We have someone looking cute in today's 𝐌𝐈 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 and it's not Samaira! 😋💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/K17aII96cd
— Mumbai Indians (@mipaltan) April 8, 2022
आयपीएल २०२२ मधील मुंबई इंडियन्सच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ते खूपच निराशाजन राहिले आहे. मुंबई त्यांचे पहिले तीन सामने दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरुद्ध गमावले आहेत. या तिन्ही सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी चांगला खेळ दाखवला, पण गोलंदाजी मात्र अपेक्षेप्रमाणे होऊ शकेलली नाही. जसप्रीत बुमराहच्या रूपात संघाकडे एकमेव गोलंदाज आहे, जो किफायतशीर प्रदर्शन करत आहे. त्याव्यतिरिक्त इतर सर्व गोलंदाज संघाला महागात पडले आहेत.
पुढच्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने संघातील सर्व सहकाऱ्यांना काही महत्वाच्या सुचना केल्या आहेत. रोहित शर्माच्या मते आतापर्यंत मिळालेल्या पराभावांसाठी कोणा एका खेळाडूला जबाबदार धरता येणार नाही. पराभव किंवा विजय, जे मिळाले ते संघाचे असेल. पुढच्या सामन्यात खेळाडूंनी विजयासाठी अधिक भूक आणि उत्सुकता दाखवण्याची गरज असल्याचेही रोहित ड्रेसिंग रूममध्ये बोलला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: ‘तू फरारी आहेस, लवकरच सहाव्या घेरमध्ये जावा’, डेल स्टेनचा त्यागीला मोलाचा सल्ला
मयंकच्या थंडावलेल्या बॅटमधून दिग्गजाला गुजरातविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा; म्हणाला, ‘आता वेळ आलीय…’