---Advertisement---

आता सुरू होईल खरी दंगल…! इंग्लंडचा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज पंजाब किंग्जच्या ताफ्यात सामील

On: गुरूवार, मार्च 31, 2022 5:14 PM
Ben Stokes and Jonny Bairstow
---Advertisement---

आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्च रोजी झाली. पण काही विदेशी दिग्गज अद्याप त्यांच्या आयपीएल फ्रेंचायझीसोबत सहभागी झालेले नाहीत. आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्जचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टो देखील सुरुवातीच्या सामन्यासाठी अनुपस्थित होता, पण दुसऱ्या सामन्यापूर्वी तो संघासोबत जोडला गेला आहे. असे असले तरी, कोरोना नियमावलीमुळे त्याला पंजाबसोबत दुसऱ्या सामन्यात खेळता मात्र येणार नाही.

पंजाब किंग्ज (Punjab Kings) फ्रेंचायझीने आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील त्यांचा पहिला सामना रॉयल चॅलेजर्स बेंगलोर (RCB) सोबत खेळला आणि यामध्ये ५ विकेट्स राखून विजय मिळवला. आता पंजाबला त्यांचा दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) सोबत खेळायचा आहे. हा सामना शुक्रवारी (१ एप्रिल), मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळाल्यानंतर पंजाब किंग्ज त्यांचा विजयीरथ पुढे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असेल.

इंग्लंडचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी जरी पंजाब किंग्जसोबत जोडला गेला असला, तरी त्याला या सामन्यात सहभाग घेता येणार नाही. बायो बबलच्या नियमांनुसार त्याला पुढचे काही दिवस विलगीकरणात राहावे लागेल आणि नंतर तो संघातील खेळाडूंसोबत सहभागी होऊ शकतो. अशात पंजाब किंग्जच्या तिसऱ्या सामन्यात निवड करण्यासाठी तो उपलब्ध असेल.

पंजाब किंग्जने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून बेयरस्टो त्यांच्या कॅम्पमध्ये सहभागी झाल्याची माहिती दिली आहे. चाहत्यांच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कही चाहत्यांनी लिहिले आहे की, ‘आता सुरू होईल खरी दंगल.’

https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1509428298635309061?s=20&t=KmFnfZ2ooxdK82VMXMeVHg

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांत्यात नुकतीच तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. इंग्लंडने या मालिकेत ०-१ असा पराभव स्वीकराला. आता पंजाब किंग्जसाठी बेयरस्टो वरच्या फळीत कर्णधार मयंक अगरवाल आणि शिखर धनवसोबत खेळताना दिसेल. बेयरस्टोने एका मैदानात आगमन केले, की तो भानुका राजपक्षेच्या जागी यष्टीरक्षकाची भूमिकाही स्वीकारेल.

बेयरस्टी विरोधी संघाच्या गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. तसेच तो कणत्याही क्रिमांकावर फलंदाजी करू शकतो. मागच्या तीन हंगामात त्याने सनरायझर्से हैदराबादचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या २८ सामन्यांमध्ये त्याने ४० च्या सरासरीने आणि १४० च्या स्ट्राइक रेटने १०३८ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

आरसीबीच्या ‘मॅन ऑफ द मॅच’ हसरंगाच्या स्पेशल सेलिब्रेशनने लुटली मैफील, जाणून घ्या त्यामागचे कारण

वॅटचे शतक, इक्लेस्टोनच्या ६ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेवरील मोठ्या विजयासह इंग्लंडची विश्वचषक फायनलमध्ये धडक

विजयाचं खातं उघडण्यासाठी पलटणला ‘मास्टर ब्लास्टर’कडून महत्त्वाच्या टिप्स, मुंबई इंडियन्सने शेअर केला Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---