---Advertisement---

पंजाब किंग्जची साथ सोडणाऱ्या जाफरच्या जागी ‘या’ दिग्गजाची वर्णी, असेल संघाचा नवा फलंदाजी प्रशिक्षक

On: मंगळवार, फेब्रुवारी 15, 2022 11:26 PM
Wasim-Jaffer
---Advertisement---

आयपीएल लिलावाच्या (IPL mega auction) दोन दिवस अगोदर पंजाब किंग्ज संघाचे फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर यांनी एक निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. या माजी सलामीवीर फलंदाजाने संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. नुकत्याच बँगलोरमध्ये पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावानंतर पंजाब किंग्जने नव्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली आहे.  फ्रँचायझीने मंगळवारी (१५ फेब्रुवारी) संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्स याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

रोड्स हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी ८००० हून अधिक धावा केल्या आहेत. गेल्या आठवड्यात आयपीएल लिलावादरम्यान ५२ वर्षीय रोड्स मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि सह-संघ मालकांसोबत होता. रोड्सने २४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५९३५ आणि ५२ कसोटीत २५३२ धावा केल्या आहेत.

आता रोड्स फलंदाजी प्रशिक्षक बनल्यानंतर कुबंळे मुख्य प्रशिक्षकासह फिरकीपटूंसोबत काम करेल, तर डॅमियन राईट वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करेल. गेल्या हंगामात संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या अँडी फ्लॉवरनेही संघापासून स्वतःला दूर केले होते. ते यावेळी लखनऊ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. पंजाब किंग्जने कधीही आयपीएलचे विजेतेपद जिंकले नाही, फक्त २०१४ मध्ये अंतिम फेरी गाठली होती.

पंजाब किंग्सने या हंगामात उत्तम खेळाडू शिखर धवन, शाहरुख खान, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, ओडियन स्मिथ यांना विकत घेतले आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा स्टार राज बावा यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

लिलावात पंजाब संघाजवळ सर्वाधिक पैसे होते. संघाने मयंक अग्रवालला १२ कोटी रुपयात तर अर्शदीप सिंगला ४ कोटींना संघात कायम ठेवले होते. संघाने अद्याप आपल्या कर्णधाराचे नाव जाहीर केलेले नाही. गेल्या मोसमात एका सामन्यात मयंक अग्रवाल कर्णधार होता. असे मानले जात आहे की त्याला कर्णधारपद दिले जाऊ शकते, पण शिखर धवनला सुद्धा कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे. त्याला सुद्धा कर्णधारपदाचा अनुभव आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० मोड ऑन! ‘रोहितसेना’ लागली सरावाला, वनडेनंतर टी२०तही विंडीजला देणार पराभवाचा धक्का?

‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटला कर्णधार रोहितची साथ; पत्रकाराच्या प्रश्नावर म्हणाला, “तुम्ही शांत राहिला तर…”

आगामी आयपीएलसाठी सनरायझर्सचा मोठा ‘गेमप्लॅन’! ‘हा’ अष्टपैलू उतरणार सलामीला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---