---Advertisement---

ए भावा थांब! अर्ध्यापेक्षा जास्त अवॉर्डचे पैसे एकटा बटलर गेला घेऊन, ‘इतक्या’ वेळा आला स्टेजवर

Jos-Buttler-Award-Receiving
---Advertisement---

आयपीएल २०२२चा हंगाम संपला आहे. नवख्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२चे विजेतेपद पटकावले आहे. तर राजस्थान रॉयल्स उपविजेता ठरला आहे. भलेही राजस्थान संघाला अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास करूनही हताश व्हावे लागले असले तरीही, राजस्थानचे खेळाडू मात्र पुरस्कार जिंकण्यात अग्रेसर राहिले. आयपीएलमधील ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) आणि पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) विजेता राजस्थान संघाचाच राहिला. त्यातही आयपीएलमधील सर्वाधिक पुरस्कार एकट्या जोस बटलर याच्या नावे झाले. 

बटलरने (Jos Buttler) सर्वाधिक धावांचा ऑरेंज कॅपचा (Orange Cap) पुरस्कार जिंकण्याव्यतिरिक्त इतर अनेक पुरस्कारही जिंकले. यासाठी अंतिम सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभावेळी त्याला किती वेळा तरी (Jos Butter Grabs Many Awards) मंचावर जावे लागले. त्यामुळे आयपीएलमध्ये पुरस्कारांसाठी मिळणारे अर्ध्याहून अधिक पैसे एकट्या बटलरच्या खात्यात गेले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आयपीएल विजेती टीम क्रिकेटर्सला काय बक्षीस देते? IPL Winning Prize Money | IPL Winners | IPL Trophy

बटलरने वेगवेगळ्या कॅटेगरीतील बरेच मोठमोठे पुरस्कार आपल्या नावावर केले. यातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार सर्वाधिक धावांसाठी मिळणारा ऑरेंज कॅपचा पुरस्कार राहिला. त्याने संपूर्ण हंगामात १७ सामने खेळताना ८६३ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सर्वाधिक ४ शतके आणि ४ अर्धशतके निघाली. या पुरस्कारासाठी त्याला १० लाख रुपये देण्यात आले.

ऑरेंज कॅपव्यतिरिक्त आणखी ५ पुरस्कार जिंकले. त्याने सर्वाधिक मौल्यवान खेळाडू, पावर प्लेयर ऑफ द सीजन, ड्रीम इलेव्हन गेम चेंजर, सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक षटकारांसाठी मिळणारे वेगवेगळे पुरस्कार बटलरने जिंकले. या सर्व पुरस्कारांसाठी त्याला प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले. अशाप्रकारे बटलरला रिटेंशनचे १० कोटी वगळता पुरस्कारांमधून ६० लाख रुपये बटलरने जिंकले.

जोस बटलरला मिळालेले पुरस्कार आणि पैसे-
ऑरेंज कॅप – १० लाख रुपये
सर्वात मौल्यवान खेळाडू – १० लाख रुपये
पॉवर प्लेअर ऑफ द सीझन – १० लाख रुपये
ड्रीम इलेव्हन गेमचेंजर – १० लाख रुपये
सर्वाधिक षटकार – १० लाख रुपये
सर्वाधिक चौकार – १० लाख रुपये

महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

काय आहे गुजरातच्या यशाचं गमक? उपकर्णधार राशिद खानने उलघडले गुपीत

अश्विन महान क्रिकेटर, पण गोलंदाजीत ‘या’ सुधारणेही आहे गरज; कुमार संगकाराचा कडवा सल्ला

धोनीच्या ‘त्या’ विक्रमाची ११ वर्षांनंतर गिलकडून पुनरावृत्ती

IPLमध्ये करोडोंची बोली लागल्यानंतर खरंच तेवढे पैसे Cricketersच्या खात्यात जमा होतात का?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---