आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने चालू हंगामात खेळलेल्या चार सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत, तर एक सामना गमावला आहे. आरसीबीला त्यांचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्जसोबत खेळायचा आहे. पुढच्या सामन्यासाठी आरसीबीच्या ताफ्यात वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ आणि जोश हेजलवुड जोडले गेले आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंना ५ एप्रिलपूर्वी आयपीएलसाठी भारतात जाण्याची परवानगी दिली नसल्यामुळे पहिल्या काही सामन्यासाठी हे दोघे आरसीबीच्या ताफ्यात सहभागी होऊ शकले नाहीत. परंतु सीएसकेविरुद्धच्या पुढच्या सामन्यात जेसन बेहरेनडॉर्फ (Jason Behrendorff) आणि जोश हेजलवुड (Josh Hazelwood) हे दोघेही निवडप्रक्रियेसाठी उपलब्ध असतील. ५ एप्रिलपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता आणि याच कारणास्तव ऑस्ट्रेलियन खेळाडू पहिल्या काही आयपीएल सामन्यांना मुकले आहेत.
या दोघा वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त असे अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत, ज्यांना आयपीएलच्या पहिल्या सामन्यांमध्ये सहभाग घेता आला नाही. परंतु हे सर्वजन त्यांच्या फ्रँचायझीसोबत सहभागी झाले आहेत. बेहरेनडॉर्फ ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात खेळला होता. पण हेजलवुड मात्र फक्त कसोटी सामन्यात खेळला होता. पण त्यानंतर त्याने वैयक्तिक कारणास्तव विश्रांती घेतल्याचीही माहिती समोर आली होती.
आरसीबीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हे दोन्ही वेगवान गोलंदाज ताफ्यात सहभागी झाल्याची माहिती दिली आहे. दोघांनी विलगीकरण कालावधी पूर्ण करून सराव सत्रात देखील सहभाग घेतला आहे. आरसीबीने त्यांचे काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “जोस हेजलवुड आणि बेहरेनडॉर्फकडून शुभ सकाळ, तुमचा सोमवार चांगला जावा.”
https://www.instagram.com/p/CcMUAALs1z4/?utm_source=ig_web_copy_link
आरसीबी आणि सीएसके यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर फॉफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाली संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. तर दुसरीकडे नवखा कर्णधार रवींद्र जडेजा सीएसकेला अद्याप एकही विजय मिळवून देऊ शकला नाहीय. आरसीबीने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत, पण सीएसेकला चालू हंगामात अजून एकही विजय मिळालेला नाहीय.
आयपीएल २०२२ मध्ये असा आहे आरसीबीचा संघ –





