इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाला यशस्वी संघ बनवण्यात एमएस धोनी याचा मोठा वाटा राहिला आहे. त्याने कर्णधार असताना चेन्नईला ४ ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. आता आयपीएल २०२२मध्ये त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु खेळाडू म्हणूनही तो संघासाठी मौल्यवान खेळ दाखवत आहे. त्याने अंतिम षटकात दमदार फलंदाजी करत संघाला एक सामनाही जिंकून दिला आहे. त्याच्या याच फिनिशिंगच्या शैलीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज ब्रॅड हॉग यालाही धोनीच्या सामना फिनिश करण्याच्या क्षमतेची भुरळ पडली आहे.
एका यूट्यूब चॅनलवर बोलताना हॉगने (Brad Hogg) धोनीची (MS Dhoni) प्रशंसा केली (Brad Hogg Praises MS Dhoni) आहे. “धोनी खास क्षणाच्या प्रतिक्षेत असतो. त्याला अशा संधीची प्रतिक्षा असते कारण त्याचा स्वत:वर विश्वास आहे. कोणतेही लक्ष्य जास्त मोठे नसते. मग ते एका षटकात १५ धावा करणे असो वा एका षटकात ३० धावा करणे असो. त्याला आताही असे वाटते की, तो कोणत्याही स्थितीत त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो. तसेच त्याला आधीपासूनच माहिती असते की, गोलंदाज काय विचार करत असतो. धोनीसाठी कोणतेही लक्ष्य जास्त मोठे नसते. तो कोणत्याही स्थितीत सामना जिंकून देऊ शकतो,” असे हॉग म्हणाला.
धोनीने कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध फिनिशरची भूमिका निभावली होती. हा आयपीएल २०२२ हंगामातील ३३ वा सामना होता. या सामन्यात धोनीने मुंबईच्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने १३ चेंडू खेळताना २८ धावा फटकावल्या होत्या. त्याच्या शेवटच्या षटकातील धुव्वादार खेळीच्या जोरावर चेन्नईने ३ विकेट्स राखून विजय मिळवला होता.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातही धोनीने शेवटच्या षटकांमध्ये संघाच्या विजयाच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या होत्या. परंतु काही शानदार फटके खेळल्यानंतर रिशी धवनने त्याला बाद केले. परिणामी चेन्नईला तो सामना जिंकण्यात यश आले नव्हते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘सीएसके त्याचे कुटुंब आहे, बंदी उठल्यानंतर आनंदात होता माही’, इंग्लंडच्या दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
‘बदलून टाका तो नियम’, पंत आणि आमरेंनी घातलेल्या राड्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकाची मोठी मागणी
आरसीबीच्या माजी कर्णधाराची भविष्यवाणी; सांगितली आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या ‘या’ ४ संघांची नावे