---Advertisement---

आयपीएल इतिहासातील सर्वात खराब रिव्ह्यू! आरसीबीच्या कर्णधाराची सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

On: गुरूवार, मार्च 31, 2022 3:05 PM
Faf-Du-Plesis-Review
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात बुधवारी (३० मार्च) आमना सामना झाला. आयपीएल २०२२ च्या या सहाव्या सामन्यात आरसीबीने ३ विकेट्स राखून केकेआरला धूळ चारली आहे. सामन्यात गोलंदाजांचे उघडपणे वर्चस्व पाहायला मिळाले. केकेआर प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही आणि आरसीबीला मिळालेले छोटेसे लक्ष्य त्यांनी सहज गाठले. आरसीबीच्या गोलंदाजीवेळी त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने एक असा रिव्यू घेतला, जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब रिव्यू असल्याचे म्हटले जात आहे.

या रिव्यूला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब रिव्यू यासाठी म्हटले जात आहे की, चेंडू बॅटच्या ठीक मध्यभागी लागला होता. तरीही आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) याने एलबीडब्ल्यूसाठी रिव्यू घेतला आणि तो वाया गेला. यावेळी वेगवान गोलंदाज हर्षल पटेल गोलंदाजी करत होता आणि समोर फलंदाज वरुण चक्रवर्ती होता. हर्षलने टाकलेला चेंडू अगदी उत्कृष्ट आणि स्टंपवर होता. गोलंदाज हर्षल पटेलने हा विचार करून अपील केली की, चेडू शक्यतो फलंदाजाच्या बुटाला लागला असावा. डू प्लेसिसने यानंतर रिव्यू घेतला आणि तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब रिव्यू ठरला. कारण, चेंडू बॅटच्या अगदी मधोमध लागला होता.

https://twitter.com/rishabh2209420/status/1509192709411524612?s=20&t=seVDwMJ017IO4-fRqhhz6w

दरम्यान सामन्याचा विचार केला, तर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. केकेआरने एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या आणि त्यांच्या संपूर्ण संघ अवघ्या १२८ धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर प्रत्युत्तरात आरसीबीला हे छोठे लक्ष्य गाठण्यासाठी ७ विकेट्स गमवाव्या लागल्या आणि १९.२ षटके खेळावी लागली. केकेआरसाठी आंद्रे रसल सर्वाधिक २५ धावा केल्या. तर दुसरीकडे आरसीबीसाठी श्रीलंकन फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगाने २० धावा खर्च करून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –

IPL2022| चेन्नई वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

CSK vs LSG | केव्हा आणि कसा पाहाल चेन्नई वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान, जाणून घ्या सर्वकाही

कर्णधार डू प्लेसिसने कार्तिकला म्हटले धोनीसारखे ‘कूल’, उधळली स्तुतीसुमने; वाचा स्टेटमेंट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---