कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू आंद्रे रसेल आयपीएल २०२२मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. परंतु सोमवारी (२ मे) राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रसेल फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये योगदान देऊ शकला नाही. त्याच्यावर गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची वेळ या सामन्यात आली नसली, तर त्याने मैदानात केलेल्या एक कृत्यामुळे तो चर्चेत आला.
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यातील हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर पार पडला. केकेआरने ७ विकेट्स राखून राजस्थानला धूळ चारली आणि हंगामातील त्यांचा चौथा विजय मिळवला. गुणतालिकेत त्यांचा संघ आता सध्या ८ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. केकेआरचा अष्टपैलू आंद्रे रसेल (Aandre Russell) याला सोमवारी फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी मिळाली नसली, तर त्याने मैदानात डान्स करून चाहत्यांचे मनोरंजन केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नाणेफेक जिंकून केकेआरने राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थानचा डाव संपण्याच्या काही वेळ आधी रसेलने चाहत्यांचे मनोरंजन केले. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षणांमध्ये माहोल बनवण्यासाठी मोठ्या आवाजात गाणी लावली जात असतात. रसेल सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता आणि तितक्यात ‘आता माझी सटकली’ हे गाणे लागले. रसेलच्या हातात त्यावेळी टॉवेल होता आणि तो या टॉवेलसह डान्स स्टेप्स करू लागला. रसलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरला आहे.
What an entertainer Dre Rus is 🤣🤌 #KKRvRR #IPL2022 pic.twitter.com/EOzntaiept
— Diya (@TheCricketGirll) May 2, 2022
https://twitter.com/krishnaa_ti/status/1521154489105129477?s=20&t=nS4YnIXuCeZ8dnoGLw5uPg
यावेळी समालोचन करणारे हर्षा भोगले म्हणाले की, “अरे, हे वेस्ट इंडिजचे खेळाडू, षटकार ठोकत किंवा विकेट्स घेत नसले, तरी ते त्यांच्या डान्सने सामन्याचा आनंद घेतात.”
दरम्यान, रविवारच्या या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ५ विकेट्सच्या नुकसानावर १५२ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने हे लक्ष्य ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.१ षटकात गाठले. केकेआरच्या रिंकू सिंगने (४२) अखेरच्या षटकांमध्ये चांगले प्रदर्शन केले आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! खराब फॉर्ममुळे वेंकटेश अय्यरची हाकालपट्टी; प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळाले स्थान