आयपीएल २०२२ ची सुरुवात शनिवारी म्हणजेच २६ मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स आमने सामने असतील. यावर्षी अनेक विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये सहभाग घेणार आहेत. इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली असली तरी, असे काही देश आहेत, ज्यांच्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.
आयपीएला हा १५ वा हंगाम आहे आणि वेस्ट इंडीजचे तब्बल १६ खेळाडू या हंगमासाठी भारतात दाखल झाले आहेत. दक्षिण अफ्रिकेचा कगिसो रबाडा (Kagiso Rabada) पंजाब किंग्जसाठी गोलंदाजीची कमान सांभाळणार आहे, तर फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नेतृत्त्व करणार आहे.
त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि एरॉन फिंच (Aaron Finch) अशा मोठ्या नावांचाही आयपीएल २०२२ दरम्यान उल्लेख होताना दिसेल. आपण या लेखात नजर टाकणार आहोत, कोणत्या देशातील कोणते खेळाडू आयपीएलच्या आगामी हंगामात खेळणार आहेत.
आगामी आयपीएल हंगामात खेळणारे विदेशी खेळाडू –
इंग्लंड:
जॉनी बेयरस्टो (पंजाब किंग्स), बेनी हॉवेल (पंजाब किंग्स), डेविड विली (आरसीबी), लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स), ख्रिस जॉर्डन (चेन्नई सुपर किंग्ज), सॅम बिलिंग्स (कोलकाता नाइट राइडर्स), टायमल मिल्स (मुंबई इंडियन्स), जॉस बटलर (राजस्थान रॉयल्स, रिटेन), मोईन अली (चेन्नई सुपर किंग्स, रिटेन), जोफ्रा आर्चर (आयपीएल २०२३ साठी मुंबई इंडियन्स).
आयपीएमधून माघार घेतलेले इंग्लंडचे खेळाडू:
एलेक्स हेल्स (केकेआर), जेसन रॉय (गुजरात टायटन्स), मार्क वुड (लखनऊ सुपर जायंट्स).
ऑस्ट्रेलिया:
पॅट कमिन्स (केकेआर), जोश हेजलवुड (आरसीबी), डेविड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स), नॅथन एलिस (पंजाब किंग्स), सीन एबॉट (सनराइजर्स हैदराबाद), जेसन बेहरनडॉर्फ (आरसीबी), मिशेल मार्श (दिल्ली कॅपिटल्स), मॅथ्यू वेड (गुजरात टायटन्स), नाथन कुल्टर नाइल (राजस्थान रॉयल्स), रिली मेरिडिथ (मुंबई इंडियन्स), डेनियल सॅम्स (मुंबई इंडियन्स), एरॉन फिंच (केकेआर), ग्लेन मॅक्सवेल (आरसीबी, रिटेन), मार्कस स्टॉयनिस (लखनऊ सुपर जायंट्स).
दक्षिण अफ्रीका:
मार्को यानसेन (सनरायझर्स हैदराबाद), एडेन मार्करम (सनरायझर्स हैदराबाद), लुंगी एन्गिडी (दिल्ली कॅपिटल्स), कगिसो रबाडा (पंजाब किंग्स), रस्सी वॅन डर ड्यूसेन (राजस्थान रॉयल्स), ड्वेन प्रिटोरियस (सीएसके), डेविड मिलर (गुजरात जायंट्स), डेवाल्ड ब्रेविस (मुंबई इंडियन्स), क्विंटन डी कॉक (लखनऊ सुपर जायंट्स), फाफ डू प्लेसिस (आरसीबी), एन्रिच नॉर्किया (दिल्ली कॅपिटल्स, रिटेन)
वेस्ट इंडीज:
शेरफेन रदरफोर्ड (आरसीबी), फॅबियन ऍलन (मुंबई इंडियन्स), एविन लुईस (लखनऊ सुपर जायंट्स), ओडियन स्मिथ (पंजाब किंग्स), ओबॅड मॅकॉय (राजस्थान रॉयल्स), रोमारियो शेफर्ड (सनरायझर्स हैदराबाद), रोवमन पॉवेल (दिल्ली कॅपिटल्स), डोमिनिक ड्रॅक्स (गुजरात जायंट्स), निकोलस पूरन (सनरायझर्स हैदराबाद), ड्वेन ब्रावो (चेन्नई सुपर किंग्स), शिमरॉन हेटमायर (राजस्थान रॉयल्स), काइल मायर्स (लखनऊ सुपर जायंट्स), जेसन होल्डर (लखनऊ सुपर जायंट्स), अल्जारी जोसेफ (गुजरात टायटन्स), सुनील नरेन (केकेआर, रिटेन), आंद्रे रसल (केकेआर), कायरन पोलार्ड (मुंबई इंडियन्स, रिटेन)
न्यूझीलंड:
केन विलियम्सन (सनरायझर्स हैदराबाद, रिटेन), डेरिल मिशेल (राजस्थान रॉयल्स), जेम्स नीशाम (राजस्थान रॉयल्स), ट्रेंट बोल्ट (राजस्थान रॉयल्स), टिम साउदी (केकेआर), टिम सिफर्ट (दिल्ली कॅपिटल्स), ग्लेन फिलिप्स (सनराइजर्स हैदराबाद), फिन ऍलन (आरसीबी), ऍडम मिल्ने (सीएसके), मिशेल सँटनेर (सीएसके), डेवॉन कॉनवे (सीएसके), लॉकी फर्ग्यूसन (गुजरात टायटन्स)
अफगानिस्तान:
राशिद खान (गुजरात टायटन्स), नूर अहमद (गुजरात टायटन्स), रहमातुल्लाह गुरबाज (गुजरात टायटन्स), मोहम्मद नबी (केकेआर), फजलुल्लाह फारुकी (सनरायझर्स हैदराबाद).
श्रीलंका:
चामिका करुणारत्ने (केकेआर), भानुका राजपक्षे (पंजाब किंग्स), महिश तीक्ष्णा (सीएसके), दुष्मांथा चमीरा (लखनऊ सुपर जायंट्स), वानिंदु हसरंगा (आरसीबी).
बांग्लादेश:
मुस्तफिजुर रहमान (दिल्ली कॅपिटल्स)