---Advertisement---

मलिंगाचा मोठेपणा! स्वतःचाच विक्रम मोडल्यावर ब्रावोला दिल्या ‘खास’ शब्दात शुभेच्छा; लिहिले…

On: शुक्रवार, एप्रिल 1, 2022 8:02 PM
Dwyane-Bravo
---Advertisement---

वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू ड्वेन ब्रावो मागच्या काही वर्षांपासून त्याची आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जसाठी अप्रतिम प्रदर्शन करत आहे. आता तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही बनला आहे. यापूर्वी सर्वाधिक आयपीएल विकेट्स घेणारा गोलंदाज श्रीलंकन दिग्गज लसिथ मलिंगा होता. पण आता ब्रावोने मलिंगाचा हा विक्रम मोडून या यादीत  पहिला क्रमांक पटकावला आहे. स्वतःचा हा महत्वाचा विक्रम मोडीत निघाल्यावर मलिंगाने खास प्रतिक्रिया दिली आहे.

ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज बनल्यानंतर ट्वीटच्या माध्यमांतूल लसिथ मलिंगा (Lasith Malinga) व्यक्त झाला आहे. ब्रावोने केकेल्या या विक्रमासाठी मलिंगाने त्याचे कौतुक केले. ट्वीटमध्ये मलिंगाने लिहिले की, ब्रावो एक चॅम्पियन गोलंदाज आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज बनण्यासाठी शुभेच्छा. अजून खूप पुढे जायचे आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स (CSK vs LSG) या दोन संघात गुरुवारी (३१ मार्च) आमना सामना झाला. लखनऊने या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. पण सीएसकेच्या ब्रावोने स्वतःचे नाव इतिहासात कोरले. ब्रावोने या सामन्यात दीपक हूडाच्या रूपात एकमात्र विकेट घेतली आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. मलिंगाच्या नावावर १७० आयपीएल विकेट्स आहेत. आता ब्रावो १७१ आयपीएल विकेट्ससह या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. सर्वाधिक आयपीएल विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा विचार केला, तर हा विक्रम फिरकीपटू अमित मिश्राच्या नावार आहे, ज्याने १६६ विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रावोने सीएसकेसाठी अविस्मरणीय प्रदर्शन केले असले, तरी त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्ससोबत झालेली. विशेष गोष्ट तर ही आहे की, मलिंगाही मुंबई इंडियन्सचाच महत्वाचा खेळाडू होता. सीएसकेव्यतिरिक्त ब्रावोने गुजरात लायंस संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात सीएसकेने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवत खरेदी केले. या हंगामात त्याच्या प्रदर्शनावर चाहत्यांचे लक्ष असेल. चालू हंगामातील पहिल्या सामन्यात ब्रावोने केकेआरच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि लखनऊविरुद्ध त्याने एक विकेट घेतली. अशा पद्धतीने या हंगामात त्याने आतापर्यंत ४ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

कागिसो रबाडाला पंजाबकडून पदार्पणाची कॅप, तर कोलकात्यातही एक प्रमुख बदल; पाहा उभय संघ

राजस्थान संघाने चँपियन शेन वॉर्नची काढली आठवण, पदार्पणवीरांना डेब्यू कॅप देताना केली खास अपील

पराभवाचे खापर फुटणाऱ्या दुबेच्या बाजूने बोलले सीएसकेचे प्रशिक्षक, ‘या’ शब्दांत केली पाठराखण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---