आयपीएलच्या मैदानात बुधवारी (१८ मे) दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने कहर केला. चालू हंगामातील ६६ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. डी कॉक आणि कर्णधार केएल राहुलने या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सलामीवीरांची सर्वात मोठी भागीदारी उभी केली. डी कॉकसाठी हा दिवस कधीच न विसरण्यासारखा होता, कारण त्याची ही उत्कृष्ट खेळी त्याच्या कुटुबीयांनी मैदानात येऊन पाहिली.
लखनऊच्या डावाची सुरुवात करण्याठी क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आणि केएल राहुल (KL Rahul) मैदानात आले आणि डावाचा शेवट करेपर्यंत बाद झाले नाहीत. दोघांनी धुवाधार फलंदाजी केली आणि लखनऊला एकही विकेट न गमावता २१० धावा उभ्या करून दिल्या. डी कॉकने २००.०० च्या स्टाईक रेटने अवघ्या ७० चेंडूत १४० धावा केल्या म्हणजेच प्रत्येक चेंडूवर त्याने २ धावा घेतल्या. यामध्ये त्याच्या १० चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. तर राहुलने ५१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. दोघेही संपूर्ण २० षटके खेळून नाबाद राहिले.
दक्षिण अफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजांपैकी एक क्विंटन डी कॉकसाठी १४० धावांची ही खेळी अधिक महत्वाचा यासाठी ठरली, की त्याचे कुटुंबीय हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होते. जेव्हा तो विरोधी संघातील गोलंदाजांची धुलई करत होता, तेव्हा ते सर्वजन त्याला लाईव्ह पाहत होते. हा अनुभव खरोखर त्याच्यासाठी अविस्मरणीय असणार आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1526948407398514688?s=20&t=tgvVTt6VYgiMKoy8_U6bsw
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1526953034106171392?s=20&t=Ln2CT_nue7C7tecQWBGApw
https://twitter.com/ImTanujSingh/status/1526948778523078656?s=20&t=Ln2CT_nue7C7tecQWBGApw
https://twitter.com/SubbuSubash_17/status/1526950347629293568?s=20&t=Ln2CT_nue7C7tecQWBGApw
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला डी कॉक महागात पडला असला, तरी त्यांना ही विकेट खूप स्वस्तात मिळू शकत होती. केकेआरच्या अभिजीत तोमरने डावाच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये डी कॉकचा झेल सोडला होता, जेव्हा त्याने अवघ्या १२ धावा केल्या होत्या. डी कॉकने मिळालेल्या या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला आणि ही मोठी खेळी केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकमेवाद्वितीय केएल राहुल, सलग पाचव्या आयपीएल हंगामात ५०० धावा चोपत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
क्लास क्लास क्लास…! क्विंटन डी कॉकचे केकेआरविरुद्ध अवघ्या ५९ चेंडूत शतक
आगामी टी२० मालिकांसाठी वीवीएस लक्ष्मण बनणार टीम इंडियाचा महागुरू, मग द्रविडचं काय? वाचा






