मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३१ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. हा सामना मंगळवारी (१९ एप्रिल) डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार असून त्यापूर्वी ७.०० वाजता नाणेफेक होणार आहे. दरम्यान, या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते, हे पाहू.
असा असू शकतो लखनऊ सुपर जायंट्सचा संभावित संघ
लखनऊ संघाने आत्तापर्यंत ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत. आता त्यांना सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी लखनऊच्या संभावित ११ जणांच्या (LSG Predicted XI) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.
सलामीला नेहमीप्रमाणे कर्णधार केएल राहुल (KL Rahul) यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकसह फलंदाजी करू शकतो. तसेच मधल्या फळीत मनिष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी जबाबदारी सांभाळू शकतात. तसेच अष्टपैलू म्हणून कृणाल पंड्या आणि जेसन होल्डर यांची निवड होऊ शकते. तर गोलंदाजीसाठी दुश्मंता चमिरा, आवेश खान, रवी बिश्नोई यांची निवड होण्याची शक्यता आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा संभावित संघ – केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मनिष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, दुश्मंता चमिरा, आवेश खान, रवी बिश्नोई
असा असू शकतो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संभावित संघ –
बेंगलोर संघानेही आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यातील ४ सामने जिंकले असून २ पराभूत झाले आहेत. आता त्यांना ७ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी बेंगलोरच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (RCB Predicted XI) विचार करायचा झाल्यास त्यांच्याही संघात मोठा बदल होण्याची शक्यता कमीच आहे.
याआधीच्या सामन्यांप्रमाणेच कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) अनुज रावतबरोबर सलामीला दिसू शकतो. तसेच मधली फळी विराट कोहली, शाहबाद अहमद, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाईसह अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल सांभाळताना दिसू शकतात. तसेच गोलंदाजीत वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड आणि मोहम्मद सिराज यांची निवड जवळपास पक्की आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संभावित संघ – फाफ डू प्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली, शाहबाद अहमद, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज.
अशी असू शकते ड्रीम ११
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या ड्रीम ११ बद्दल (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून आपण केएल राहुल, क्विंटन डी कॉक, दिनेश कार्तिक या तीन खेळाडूंची निवड करू शकतो, कारण हे तिघेही सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. तसेच फलंदाजी फळीत विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, दीपक हूडा यांची निवड होऊ शकते. तर अष्टपैलू म्हणून ग्लेन मॅक्सवेलला संधी मिळू शकते.
गोलंदाजी फळीसाठी वनिंदू हसरंगा, आवेश खान, रवी बिश्नोई, जोश हेजलवूड यांच्यावर विश्वास दाखवला जाऊ शकतो. तसेच कर्णधार म्हणून केएल राहुल आणि उपकर्णधार म्हणून ग्लेन मॅक्सवेलची निवड होऊ शकते.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (LSG vs RCB) ड्रीम ११
कर्णधार – केएल राहुल
उपकर्णधार – ग्लेन मॅक्सवेल
यष्टीरक्षक – केएल राहुल, क्विंटन डी कॉक, दिनेश कार्तिक
फलंदाज – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, दीपक हूडा
अष्टपैलू – ग्लेन मॅक्सवेल
गोलंदाज – वनिंदू हसरंगा, आवेश खान, रवी बिश्नोई, जोश हेजलवूड
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
बिंग ब्रेकिंग! पुण्यात होणाऱ्या दिल्ली वि. पंजाब IPL सामन्याचे ठिकाण बदलले, कोरोना ठरलंय कारण
गरमागरमी! फिंच बाद होताच प्रसिद्ध कृष्णाबरोबर झाला वाद, मग गोलंदाजानेही दिले प्रत्युत्तर, पाहा Video
देवदत्त पडीक्कलचा कोलकाताविरुद्ध केवळ २४ धावा करूनही मोठा पराक्रम; विराट-रोहितला पछाडलं