आयपीएलच्या मैदानात रविवारी रात्री (१५मे) राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना झाला. उभय संघातील हा सामना राजस्थानसाठी अतिशय महत्वाचा होता. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थानला साखळी फेरीतील त्यांचे राहिलेले सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. अशात या सामन्यात जोस बटलरकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती, पण तो अवघ्या २ धावा करून बाद झाला.
आयपीएल २०२२ मध्ये जोस बटलर (Jos Buttler) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने हंगामातील पहिल्या सामन्यापासून अप्रतिम प्रदर्शन केले आहे. पण मागच्या काही सामन्यांपासून तो अपेक्षित प्रदर्शन करू शकेलला नाहीये. रविवारी तो, लखनऊ सुपर जायंट्सच्या आवेश खानच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
उभय संघातील हा महत्वाचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १७८ धावा केल्या. यामध्ये यशस्वी जयस्वालने ४१, संजू सॅमसनने ३२, तर देवदत्त पडिक्कलने ३९ धावांचे योगदान दिले. मात्र, सलामीवीर बटलर संघाला चांगली सुरुवात देऊ शकला नाही. लखनऊच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये राजस्थानच्या फलंदाजांचा घाम काढला. पहिल्या दोन षटकांमध्ये राजस्थानने अवघ्या ११ धावा केल्या होत्या.
https://twitter.com/MohitKu38157375/status/1525846964923154432?s=20&t=yKDadhio5s0p2HkhNOEyqQ
या ११ धावांमध्ये सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या २ चौकारांचा समावेश होता. अशात बटलरवर मात्र धावा करण्यासाठी दबाव वाढला आणि याच दबावामध्ये तो बाद झाला. राजस्थानच्या डावातील तिसरे षटक आवेश खान (Avesh Khan) घेऊन आला होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आवेशने बटलरची विकेट घेतली. आवेशने टाकलेला या शॉर्ट चेंडूवर बटलरने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटला लागलाही नाही आणि थेट स्टंपमध्ये घुसला.
बटलर जर अजून अधिक वेळ खेळपट्टीवर कायम राहिला असता, तर त्याला रोखणे कठीण होऊ शकत होते. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये देखील तो सेट होईपर्यंत हळूवार खेळला आहे. परंतु सेट झाल्यानंतर त्याने गोलंदाजांची बेदम धुलाई केल्याचे दिसले आहे. हंगामात बटलरने आतापर्यंत तीन शतके ठोकली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अभिराम निलाखे, ईशान दिगंबर, सिद्धी खोत, श्रावणी देशमुख यांचा मुख्य फेरीत प्रवेश
ऋतुराजने दाखवला धोनीच्या फेमस ‘हेलिकॉप्टर शॉट’चा नवा व्हर्जन, प्रभावी शॉटचा Video पाहा