भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) आयपीएलचा १५ (IPL 15) वा हंगाम भारतातच आणि त्यातही महाराष्ट्रात खेळवण्याचे ठरवले आहे. अशात आयपीएलची स्पर्धा महाराष्ट्रात विनाव्यत्यय पार पडावी, यादृष्टीने शासन प्रशासनाच्या पातळीवर नियोजन आणि उपापयोजना करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बुधवारी (०२ मार्च) महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची बीसीसीआय अधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पाडली.
या बैठकीला बीसीसीआयचे कार्यवाही सीईओ हेमांग अमिन, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आदी उपस्थित होते.
https://twitter.com/ANI/status/1498945408412053504?s=20&t=NLUxwohMRWn0HIxccP9FxA
महाराष्ट्र सरकार संघांना विशेष ‘ग्रीन चॅनेल’ची परवानगी देऊन स्टेडियममध्ये लवकर पोहोचण्यास मदत करण्याचा विचार करत आहे, जी सामान्यतः रुग्णवाहिका आणि व्हीआयपी दर्जाच्या लोकांसाठी वापरली जाते.
या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून २९ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यादरम्यान एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. यातील ७० सामने साखळी फेरीत होतील, तर ४ सामने प्लेऑफचे असतील. विशेष म्हणजे, या ७० सामन्यांपैकी ५५ सामने मुंबईच्या वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडिअमवर, तर उर्वरित १५ सामने पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना संक्रमित राउफच्या जागी ‘या’ हॅट्रिकवीराची पाकिस्तानच्या कसोटी संघात वर्णी, करणार पुनरागमन