इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला शनिवारपासून (२६ मार्च) सुरुवात होणार आहे. हा हंगाम अनेक गोष्टींमुळे वेगळा असणार आहे. या हंगामापासून १० संघ या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत आणि एकूण ७४ सामन्यांचा हा हंगाम असणार आहे. दरम्यान, या हंगामाच्या सामन्यांसाठी समालोचन करणाऱ्या समालोचकांची यादी समोर आली आहे. या हंगामात विविध भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळणार आहे. त्यात मराठी क्रिकेट चाहत्यांसाठीही आनंदाची बातमी म्हणजे यंदा मराठी समालोचनही ऐकायला मिळणार आहे.
यावेळी आयपीएलमध्ये (IPL 2022) तब्बल भारतातील एकूण ८ भाषांमध्ये समालोचन होणार आहे. यामध्ये हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली, मराठी, मल्याळम आणि गुजराती या भाषांमध्ये समालोचन होणार असून एकूण ८० समालोचक असणार आहेत (IPL Commentary).
मराठीमध्ये कुणाल दाते, प्रसन्ना संत, चौतन्य संत, स्नेहल प्रधान, विनोद कांबळी, संदीप पाटील आणि अमोल मुजूमदार हे मुख्य करून समालोचन करताना दिसतील. तसेच रवी शास्त्री, धवल कुलकर्णी आणि किरण मोरे हे देखील हिंदी समालोचन करताना मराठी समालोचन देखील करणार आहेत.
यंदा आयपीएलचे सामने स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दिसणार असून या चॅनेलसाठी समालोचन करणाऱ्या चमालोचकांचे मानधनही लाखो रुपयांमध्ये असणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार इंग्लिश समालोचन करणाऱ्या समालोचकांना २५०,००० ते ५०००,००० अमेरिकन डॉलर, हिंंदी सामालोचकांना ८०,००० ते ३५०,००० अमेरिकन डॉलर मानधन मिळणार आहे. यंदा हिंदी समालोचन करताना सुरेश रैना देखील दिसणार आहे.
मुंबई-पुण्यात आयपीएल सामने
आयपीएलमधील साखळी फेरीतील ७० सामने मुंबई आणि पुणे येथील ४ स्टेडियमवर होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम या मैदानांवर सामने होणार आहेत, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम गहुंजे येथे सामने होणार आहेत.
आयपीएल २०२२ मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या गतविजेत्या आणि गतउपविजेत्या संघात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच कोलकाताला जबर धक्का; दोन प्रमुख खेळाडू पहिल्या ५ सामन्यांना मुकणार
त्यावेळी किरण मोरेंनी पैश्यांना प्राधान्य दिले असते तर आज कृणाल-हार्दिक टीममध्ये दिसले नसते