मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील तिसरा डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) शनिवारी (९ एप्रिल) होणार आहे. शनिवारचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) संघात होणार आहे. हंगामातील हा १७ वा सामना असून डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. तसेच त्याआधी दुपारी ३ वाजता नाणेफेक होईल. या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
असा असू शकतो चेन्नई सुपर किंग्सचा संभावित संघ
चेन्नई सुपर किंग्सने आत्तापर्यंत या हंगामात ३ सामने खेळले आहेत. या खेळलेल्या तिन्ही सामन्यांत त्यांना पराभव पाहावा लागला आहे. त्यामुळे आता ते विजयी पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, चेन्नई हा संघ आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे चौथ्या सामन्यासाठीही संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या संभावित ११ जणांच्या (CSK predicted XI) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास रॉबिन उथप्पासह ऋतुराज गायकवाड सलामीला फलंदाजी करू शकतो. तसेच मधली फळी अष्टपैलू मोईन अलीसह अंबाती रायडू, एमएस धोनी सांभाळताना दिसू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू जडेजासह शिवम दुबे, ड्वेन ब्रावो यांनाही संघात स्थान दिले जाईल. गोलंदाजी फळीत ड्वेन प्रिटोरियस, ख्रिस जॉर्डन आणि मुकेश चौधरी यांना संधी मिळू शकते.
चेन्नई सुपर किंग्सचा संभावित संघ – रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, ख्रिस जॉर्डन आणि मुकेश चौधरी.
असा असू शकतो सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ
चेन्नईप्रमाणेच केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघालाही विजयाची प्रतिक्षा आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या २ सामन्यांपैकी दोन्ही सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यांना आता तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध खेळायचा आहे.
या सामन्यासाठी हैदराबादच्या अंतिम ११ जणांच्या (SRH Predicted XI) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास सलामी जोडी बदललेली दिसू शकते. सलामीला या सामन्यात अभिषेक शर्मासह राहुल त्रिपाठी उतरू शकतो. तसेच कर्णधार केन विलियम्सन मधल्या फळीत खेळताना दिसून येऊ शकतो. त्याच्यासह मधल्या फळीत ऐडेन मार्करम, निकोलस पूरन यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल सामद आणि रोमारियो शेफर्ड यांना संधी मिळू शकते, तर गोलंदाजी फळीत भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि टी नटराजन यांच्यावर विश्वास दाखवला जाऊ शकतो.
सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ – अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियम्सन (कर्णधार), ऐडेन मार्करम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल सामद, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि टी नटराजन.
अशी असू शकते ड्रीम ११
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad) संघात होणाऱ्या सामन्यातील ड्रीम ११ चा (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून एमएस धोनीला संधी दिली जाऊ शकते. तसेच फलंदाज म्हणून ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी यांची निवड केली जाऊ शकते. तसेच अष्टपैलू म्हणून रविंद्र जडेजा, मोईन अली यांची निवड होऊ शकते. गोलंदाजीत ड्वेन ब्रावो, टी नटराजन आणि उमरान मलिक यांना संधी दिली जाऊ शकते. कर्णधार म्हणून ड्वेन ब्रावो आणि उपकर्णधार केन विलियम्सनला केले जाऊ शकते.
कर्णधार – ड्वेन ब्रावो
उपकर्णधार – केन विलियम्सन
यष्टीरक्षक – एमएस धोनी
फलंदाज – ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी
अष्टपैलू – रविंद्र जडेजा, मोईन अली
गोलंदाज – ड्वेन ब्रावो, टी नटराजन, उमरान मलिक
महत्त्वाच्या बातम्या –
GT vs PBKS| शेवटच्या दोन चेंडूवर षटकार लगावताच तेवातियाचा धोनी-जडेजाच्या खास क्लबमध्ये समावेश
IPL 2022| हैदराबाद की चेन्नई कोण मिळवणार पहिला विजय? सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही