मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवारी (१६ एप्रिल) डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवला जाणार आहे. या दिवसाचा दुसरा सामना हा हंगामातील २७ वा सामना असणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. दिल्लीचा हा पाचवा सामना असणार आहे. तसेच रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सहावा सामना असणार आहे.
दिल्ली संघाची कामगिरी आयपीएलच्या १५ व्या हंगामात समाधानकारक झाली आहे. त्यांनी चार पैकी दोन सामने जिंकले असून दोन सामने पराभूत झाले आहेत. तसेच बेंगलोर संघाची कामगिरीही संमिश्र झाली आहे. त्यांनी पाच पैकी तीन सामने जिंकले असून दोन सामने पराभूत झाले आहेत.
असे असू शकतात संभावित संघ
रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वातील दिल्ली संघाला आता पाचव्या सामन्यात बेंगलोरचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (DC Predicted XI) विचार करायचा झाल्यास डेव्हिड वॉर्नर पृथ्वी शॉसह सलामीला फलंदाजी करू शकतो. तसेच मधल्या फळीत मिशेल मार्शला संधी मिळू शकते.
तसेच कर्णधार रिषभसह रोवमन पॉवेल आणि ललित यादव अशू शकतात. अक्षर पटेल फिरकी गोलंदाजीची धूरा सांभाळण्याबरोबरच अष्टपैलूचीही भूमिका निभावू शकतो. तसेच गोलंदाजी फळीत शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजूर रेहमान आणि खलील अहमद यांना संधी दिली जाऊ शकते.
फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) नेतृत्वातील बेंगलोर संघाला दिल्लीविरुद्ध हंगामातील सहावा सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी बेंगलोरच्या संभावित ११ जणांच्या (RCB Predicted XI) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास कर्णधार फाफ डू प्लेसिससह अनुज रावत सलामीला फलंदाजी करू शकतो.
तसेच मधल्या फळीत माजी कर्णधार विराट कोहलीसह शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभूदेसाई असतील. त्यांना यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची साथ मिळू शकते. तसेच गोलंदाजीत वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवूड यांचे पर्याय असतील.
आमने-सामने
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आत्तापर्यंत २६ सामने झाले आहेत. यामध्ये बेंगलोरने १५ सामने जिंकले असून दिल्लीने १० सामने जिंकले आहेत. तसेच एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
खेळपट्टी आणि हवामान
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore) संघात वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सामना होणार आहे. या मैदानावर आत्तापर्यंत पाचपैकी चार सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. असे असले तरी, या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजांचे वर्चस्व बऱ्यापैकी दिसून येते. तसेच या सामन्यावेळी मुंबईतील तापमान २७-२८ डिग्री सेल्सियसदरम्यान असू शकते. तसेच हवेत ८० ते ८५ टक्क्यांदरम्यान आद्रता राहू शकते.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) दिल्ली विरुद्ध बेंगलोर (DC vs RCB) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामना १६ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामना वानखेडे स्टेडियम येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
दिल्ली कॅपिटल्स संघ: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सरफराज खान, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद, मनदीप सिंग, श्रीकर भारत, टीम सेफर्ट, लुंगी एन्गिडी, अश्विन हेब्बर, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, एन्रिच नॉर्किया, कमलेश नागरकोटी, चेतन साकारिया, रिपल पटेल, यश धुल, विकी ओस्तवाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, आकाश दीप, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, शेरफेन रदरफोर्ड, कर्ण शर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, चामा व्ही मिलिंद, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, अनिश्वर गौतम
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| मुंबई वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
हैदराबादच्या पठ्ठ्यानं गाजवलं मैदान, अवघ्या २१ चेंडूत झळकावलं हंगामातलं दुसरं वेगवान अर्धशतक