---Advertisement---

IPL2022| मुंबई वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: शनिवार, एप्रिल 2, 2022 12:52 PM
MI-vs-RR
---Advertisement---

मुंबई। शनिवारी (२ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये दुसरा डबल हेडर पाहायला मिळणार आहे. डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियम येथा हा सामना रंगणार असून हंगामातील हा नववा सामना आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी दुपारी ३ वाजता नाणेफेक होईल. या सामन्यासाठी कशी असू शकते ड्रीम ११ हे पाहू.

असा असू शकतो मुंबई इंडियन्सचा संभावित संघ 
पाचवेळचा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या हंगामाची सुरुवात चांगली झालेली नाही. त्यांना पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संभावित ११ जणांच्या (Mumbai Indians Predicted 11) संघाबद्दल बोलायचे झाल्यास राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून सूर्यकुमार यादवचे पुनरागमन होऊ शकते.

मुंबई इंडियन्सकडून याबद्दल संकेत देण्यात आले आहेत की, सूर्यकुमार पूर्ण तंदुरुस्त असून आता तो मैदानातही उतरू शकतो. त्यामुळे तो मधल्या फळीत खेळताना दिसू शकतो. त्याच्यासह अनमोलप्रीत सिंग, कायरन पोलार्ड आणि टीम डेव्हिड हे देखील मुंबईच्या मधल्या फळीत खेळू शकतात. तसेच इशान किशनही पूर्ण तंदुरुस्त असून तो कर्णधार रोहित शर्मासह सलामीला फलंदाजीला येऊ शकतो. तसेच पोलार्डसह अष्टपैलू म्हणून डॅनियल सॅम्सही असेल. त्याचबरोबर गोलंदाजीची भिस्त मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पीवर असू शकते.

मुंबई इंडियन्सचा संभावित संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, कायरन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी.

असा असू शकतो राजस्थान रॉयल्सचा संभावित संघ 
संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ यंदा सर्वाधिक समतोल असल्याचे अनेकांनी मत मांडले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या संभावित ११ जणांच्या (Rajasthan Royals Predicted 11) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास युवा यशस्वी जयस्वाल यष्टीरक्षक जोस बटलरबरोबर सलामीला उतरू शकतो.

तसेच मधल्या फळीची जबाबदारी युवा देवदत्त पडीक्कलसह कर्णधार संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर सांभाळू शकतात, तर गोलंदाजीची जबाबदारी आर अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांच्यावर असू शकते. त्याचबरोबर रियान पराग अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळू शकतो.

राजस्थान रॉयल्सचा संभावित संघ – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर (यष्टीरक्षक), देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल.

अशी असू शकते ड्रीम ११ 
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) यांच्यातील ड्रीम ११ बद्दल (Dream XI) बोलायचे झाल्यास यष्टीरक्षक म्हणून जोस बटलर आणि इशान किशन यांना संधी मिळू शकते. तसेच फलंदाज म्हणून संजू सॅमसन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांची निवड होऊ शकते. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून कायरन पोलार्ड आणि डॅनिअल सॅम्सला संधी दिली जाऊ शकते, तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, आर अश्विन, युजवेंद्र चहल यांच्यावर विश्वास टाकला जाऊ शकतो. त्याचबरोबर कर्णधार म्हणून कायरन पोलार्डची आणि उपकर्णधार म्हणून युजवेंद्र चहलची निवड केली जाऊ शकते.

कर्णधार – कायरन पोलार्ड
उपकर्णधार – युजवेंद्र चहल
यष्टीरक्षक – जोस बटलर, इशान किशन
फलंदाज – संजू सॅमसन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव
अष्टपैलू – कायरन पोलार्ड, डॅनिअल सॅम्स
गोलंदाज – जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, आर अश्विन, युजवेंद्र चहल

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत

IPL 2022| पुण्यात रंगणार गुजरात वि. दिल्ली लढतीचा थरार! सामन्याबद्दल सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर

क्या बात! ५ असे भारतीय, जे एक नव्हे तर दोन विश्वचषक विजेत्या संघाचा राहिलेत भाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---