आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. त्यापुर्वी पंजाब किंग्स संघाने मयंक अगरवालला (Mayank Agarwal) संघाचा कर्णधार घोषीत केले आहे. या फलंदाजाला पंजाब किंग्स संघाने आयपीएल लिलावापुर्वी १२ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले होते. पंंजाब किंग्स (Punjab kings) संघाने आत्तापर्यंत एकदाही आयपीएलचा चॅम्पियन संघ बनलेला नाही. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये मयंककडे मोठी जबाबदारी असणार आहे.
मयंक अग्रवालचा जन्म १६ फेब्रुवारी १९९२ रोजी कर्नाटकच्या बेंगलोरमध्ये झाला. मयंकचे वडील एका हेल्थकेएर कंपनीचे सीईओ आहेत. तर आई सुचित्रा सिंग गृहिणी आहेत. मयंक अग्रवालची एकुण संपत्ती ३.५ दशलक्ष अमेरिकन डाॅलर्स आहे, जी भारतीय चलनात सुमारे २६ कोटी एवढी आहे. त्यात बीसीसीआयकडून दिला जाणारा पगार, आयपीएल लिलाव आणि वैयक्तिक व्यवसायातून एवढी रक्कम जमा केली आहे.
मयंकचे बेंगलोरमध्ये एक आलिशान घर आहे. तसेच त्याच्या जगभरात अनेक रियल इस्टेट मालमत्ता आहेत, त्याचे गाड्यांचे कलेक्शन फारच कमी आहे. त्याच्याकडे जगभरातील सर्वोत्तम आलिशान गाड्या आहेत. त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज एसयूव्हीचा देखील समावेश आहे. मयंकने २०१८ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण आशिता सूदसोबत लग्न केले. त्याची पत्नी वकील आहे. शालेय जिवनापासून ते दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र होते. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले आणि त्यांनी लग्न केले. आशिताचे वडील प्रवीण सूद यांनी पोलिस आयुक्तपद भूषवले आहे. तसेच ते सध्या कर्नाटकचे डीजीपी आहेत.
मयंकचे आवडते कलाकार शाहरुख खान आणि अक्षय कुमार आहेत. तसेच आलिया भट आणि कतरिना कैफ त्याच्या आवडत्या अभिनेत्री आहेत. त्याला डाळ भात खायला सर्वात जास्त आवडते. त्याला पिझ्झासारखे फास्ट फूड देखील आवडतात. मयंकने १६ कसोटी सामन्यात ४३.३० च्या सरासरीने १४२९ धावा केल्या आहेत. यादरम्यान मयंकने ४ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत. मयंकची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या २४३ धावा आहे. मयंकने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्वात मोठ्या प्रकारात २८ षटकार आणि १७८ चौकार मारले आहेत.
मयंक अग्रवालची एकदिवसीय कारकीर्द खूपच लहान राहिली आहे. मयंक अग्रवालने भारतासाठी आतापर्यंत ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १७.२ च्या सरासरीने फक्त ८६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ३२ धावा आहे. आयपीएलमध्ये मयंक अग्रवालने आतापर्यंत १०० सामने खेळले आहेत. यादरम्यान मयंकने २३.४१ च्या सरासरीने २१३१ धावा केल्या आहेत. मयंकच्या नावावर आयपीएलमध्ये एक शतक आणि ११ अर्धेशतक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय महिला विजयी ट्रॅकवर! सलग तिसऱ्या विजयासह विश्वचषकात उभारणार आव्हान (mahasports.in)