आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी बीसीसीआयने शनिवारी आणि रविवारी (१२ आणि १३ फेब्रुवारी) मेगा लिलाव (mega auction) आयोजित केला. मेगा लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंवर मोठी बोली लागली. तर काही युवा खेळडूही कोट्याधीश झाले. अष्टपैलू अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) असाच एक युवा खेळाडू आहे. सनरायझर्स हैदराबादने ६ कोटी आणि ५० लाख रुपये खर्च करून अभिषेक शर्माला पुन्हा एकदा संघात सामील केले.
मेगा लिलावात अनकॅप्ड खेळाडू अभिषेक शर्माचे नाव येताच सर्व फ्रेंचायझींमध्ये त्याला विकत घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. विशेष करून अभिषेक मागच्या हंगामात ज्या संघासाठी खेळला, तो सनरायझर्स हैदराबात आणि पंजाब किंग्ज यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळाली. या दोन संघांतील स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली आणि त्याला पुन्हा एकदा संघात सामील केले. मेगा लिलावासाठी त्याची बेस प्राइस २० लाख रुपये होती, पण फ्रेंचायझीमधील चढाओढ त्याच्या फायद्याची ठरली.
मुळचा पंजाबचा असणारा अभिषेक डावखुरा फिरकी गोलंदाज आणि फलंदाजीही करू शकतो. सनरायझर्स हैदराबादसाठी अभिषेत मध्यक्रमात चांगली फलंदाजी करू शकतो. सोबतच २ किंवा ३ षटके गोलंदाजीही करू शकतो. मागच्या हंगामात त्याने हैदराबादसाठी असेच प्रदर्शन करून दाखवले होते. त्याच कारणास्तव संघाने त्याच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा विकत घेतले आहे.
अभिषेकच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत २२ आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने १३९ च्या स्ट्राइक रेटने २४१ धावा केल्या आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या ४६ धावा होती. गोलंदाजीचा विचार केला, तर त्याने ९ च्या इकोनॉमी रेटने ७ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएमधील त्याचे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन २ / ४ असे राहिले आहे. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांसाठी खेळला आहे. आगामी हंगामातील त्याचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल.
महत्वाच्या बातम्या –
‘मि. आयपीएल’ सुरेश रैनाची आयपीएल कारकीर्द संपली? घ्या जाणून त्याच्या भविष्याबद्दल
हुडा-कृणाल एकत्र आल्याने सेहवागकडून मजेदार ट्विट; म्हणाला…
‘गेले दोन महिने माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस’, श्रेयस अय्यरने मांडली व्यथा