आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी बीसीसीआयने मेगा लिलाव (mega auction) आयोजित केला होता. १२ आणि १३ फेब्रुवारीला हा मेगा लिलावा पार पडला. लिलावाचे आयोजन बेंगलोरमध्ये केले गेले होते. लिलावात सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (ishan kishan) पहिल्या क्रमांकावर राहिला. मुंबई इंडियन्सने त्याला सर्वात जास्त पैसे देऊन संघात पुन्हा एकदा स्थान दिले. मुंबई इंडियन्सने ईशानला संघात सामील केल्यानंतर खास इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. चाहत्यांमध्ये ही पोस्ट व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सने ईशान किशनची गुणवत्ता लक्षात घेऊन त्याला संघात पुन्हा घेण्यासाठी तब्बल १५.२५ कोटी रुपयांची बोली लावली. ईशान किशनला जेवढी बोली लागली, तेवढी इतर कोणत्याच खेळाडूवर लागली नाही. यात शंकाच नाही की, ईशान त्याला मिळालेली ही रक्कम पाहून आनंदी असणार. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मुबई इंडियन्सनेही हा व्हिडिओ स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CZ3-zXuDhRS/?utm_medium=share_sheet
व्हिडिओत ईशान किशन आनंदात डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओत लोकप्रीय मराठी चित्रपट ‘सैराट’ मधील ‘झिंगाट’ हे गाणे वाजत आहे आणि ईशान त्यावर डान्स करत आहेत. डान्स करताना तो पूर्ण उत्साहात आहे. चाहत्यांच्या मते ईशान १५.२५ कोटी रुपये मिळाल्यानंतर अशाच आनंदात असेल. मुंबई इंडियन्सनेही चाहत्यांच्या मनातली गोष्ट अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाव सर्वत्र व्हायरल होत आहे.
दरम्यान, इशान व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज दीपक चहर देखील खूप महागात विकला गेला. चेन्नई सुपर किंग्जने चहरला संघात सामील करण्यासाठी तब्बल १४ कोटी रुपये खर्च केले. तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागाडा खेळाडू ठरला, इंग्लिश क्रिकेटपटू लियाम लिविंगस्टोन. पंजाब किंग्जने लिविंगस्टोनला संघात घेण्यासाठी ११.५० कोटी रुपये खर्च केले. लिविंगस्टोन यावर्षी सर्वात महागडा विदेशी खेळाडू देखील ठरला.
महत्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्समध्ये सामील होताच चहलने घेतला पंगा! वाचा सविस्तर