काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पार्श्वभूमीवर मेगा लिलावाचे (IPL Mega Auction) आयोजन केले गेले होते. मेगा लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता, ज्यांच्यावर कोट्यावधी रुपयांची बोली लागली. तर काही युवा खेळाडूही मालामाल झाल्याचे पाहायला मिळाले. आता या मेगा लिलावाविषयी मोठी माहिती समोर येत आहे. यावर्षीचा मेगा लिलावात पाहणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसले.
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावावाने मागचे विक्रम मोडले आहेत. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिलच्या माहितीनुसार यावर्षी जवळपास ५० लाख लोकांनी १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडलेला मेगा लिलाव पाहिला आहे. यावर्षी एकूण ६०० खेळाडू लिलावात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यापैकी २०४ खेळाडूंवर बोली लागली, यामध्ये ६७ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर उरलेल्या खेळाडूंना कोणीच खरेदी केले नाही.
टिव्हीवर मेगा लिलावात पाहणाऱ्यांचे प्रमाणे लक्षणीयरित्या वाढले
इकोनॉमिक्स टाइम्सच्या माहितीनुसार आयपीएल मेगा लिलावात टीव्हीवर पाहणाऱ्यांमध्ये एकूण ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मेगा लिलाव पाहण्यासाठी प्रेक्षकांनी यावर्षी मिळून ३.८ अब्ज मिनिट खर्च केले आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये मेगा लिलाव आयोजित केला गेला होता. त्यावर्षी लिलावाला पाहणाऱ्या प्रेक्षकांनी एकूण २.५ अब्ज मिनिट खर्च केले होते. यावर्षी या आकड्यात मोठी वाढ दिसत आहे.
डिज्नी प्लस हॉटस्टारवर एकाच वेळी २१.८ लाख लोकांनी पहिला मेगा लिलाव
टीव्हीव्यतिरिक्त डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मेगा लिलाव प्रसारित केला गेला होता. डिज्नी प्लस हॉटस्टारवर एका वेळी २१.८ लाख लोकांनी मेगा लिलाव पाहिला होता. डिज्नी स्टारचे स्पोर्ट्स हेड संजोग गुप्ता यांनी इकोनॉमिक टाइम्स सोबत याविषयी बोलताना सांगितले की, यावर्षीचा लिलाव अप्रतिम राहिला. आम्हाला चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, यावर्षी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघांमुळे अधिक रंग चढणार आहे. आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी आयपीएल गवर्निंग काइंसिलने शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) लीग दोन ग्रुपमध्ये खेळली जाणार असल्याची माहिती दिली. म्हणजेच १० संघ पाच-पाचच्या ग्रुपमध्ये विभागले गेले आहेत. दरम्यान, आगामी हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. कोरोना विषाणूच्या कारणास्तव यावर्षीचे सर्व साखळी फेरीचे सामने मुंबई आणि पुण्यात मिळून चार स्टेडियममध्ये खेळले जातील.
महत्वाच्या बातम्या –
कॉफी घेणार का? हिमाचलच्या थंडीची सामन्यादरम्यान कर्णधार रोहित लुटतोय मजा, पाहा व्हिडिओ
श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी२० सामना जिंकूनही कर्णधार रोहित शर्मा नाराज, ‘हे’ आहे मोठे कारण
विश्वचषकापूर्वी घडली हृदयाचा ठोका चुकवणारी घटना, स्म्रीती मंधाना डोक्याला बाउंसर लागून जखमी