इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (jofra archer) आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्समध्ये (mumbai indians) सहभागी झाला आहे. बेंगलोरमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएल २०२२ साठी मेगा लिलाव घेतला गेला. मुंबई इंडियन्सने आर्चरवर सर्वात मोठी बोली लावली आणि त्याला संघात सामील केले. आर्चरला संघात सामील केल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
बीसीसीआयने आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी आयोजित केलेल्या मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभागी झाले आहेत. फ्रेंचायझींकडून अनेक मोठ्या बोल्या लावल्या गेल्या. काही युवा खेलाडूंनी यावर्षी विक्रमी कमाई केली. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघांमुळे मेगा लिलाव अधिकच रंजक बनला. मुंबईने आर्चरला संघात सामील करण्यासाठी तब्बल आठ कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला संघात सामील केले. मेगा लिलावात आर्चरचे नाव येताच त्याला खरेदी करण्यासाठी अनेक संघ इच्छुक होते. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये आर्चरसाठी चुरशीची शर्यत दिसली.
आर्चरची बेस प्राइस २ कोटी होती होती, पण संघांमध्ये झालेल्या संघर्षामुळे तो ८ कोटींपर्यंत जोऊन पोहोचला. मुंबईने अखेर बाजी मारली. असे असले तरी, तो पुढच्या हंगामात खेळताना मात्र दिसणार नाहीय. मागच्या मोठ्या काळापासून तो दुखापतींशी झगडत आहे. याच कारणास्तव तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही सध्या विश्रांतीवर आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याच्या हाताच्या कोपऱ्याची शस्त्रक्रिया देखील केली गेली होती. सध्या तो दुखापतीतून सावरत आहे. यावर्षी जरी तो आयपीएमध्ये खेळला नाही, तरी २०२३ मध्ये तो मुंबई प्रतिनिधित्व करू शकतो. जसप्रीत बुमराह आणि आर्चर या दोन दिग्गजांना मुंबईसाठी गोलंदाजी करताना आपल्याला मिळू शकते. सोशल मीडियावर चाहते याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.
— Charlie (@AFCharlie__) February 13, 2022
Other teams watching mi right now 🥳 pic.twitter.com/42CpvVUzpL
— John (@Cinephile__) February 13, 2022
@JofraArcher and @Jaspritbumrah93 in the same team be like:
What a pull by @mipaltan 🔥#IPLAuction #IPLMegaAuction pic.twitter.com/Mnr6iI43ox— Rohit Ghosh (@Rohit_Speaking) February 13, 2022
Most Deadliest combo in the World in the Bowling in this Modern Era – Jasprit Bumrah and Jofra Archer. Wow, absolute Lethal. pic.twitter.com/IvwrTumtAw
— Tanuj Singh (@ImTanujSingh) February 13, 2022
Csk pans after seeing Bumrah and jofra in MI 😂🤣 pic.twitter.com/Ze5SpsBJwx
— Siddhesh Tegade ⁴⁵ 🇮🇳 (@ImSidd4506) February 13, 2022
Jofra Archer’s old tweet goes viral. #JofraArcher #Mumbai #IndianT20League #auction #Cricket #SKY247 #Socialmedia pic.twitter.com/DGIaKdF3BI
— Sky247 (@officialsky247) February 13, 2022
https://twitter.com/ashutosh_sri8/status/1492820468138602498?s=20&t=vL1zdZqB03ga-d3mTG6Kew
दरम्यान, मेगा लिलावात मुंबईने खरेदी केलेल्या खेळाडूंचा विचार केला, तर त्यांमध्ये ईशान किशन सर्वात महागडा ठरला. इशान किशनसाठी मुंबई संघाने तब्बल १५ कोटी २५ लाख रुपये खर्च केले. त्याव्यतिरिक्त सिंगापूरचा अष्टपैलू टीम डेविडसाठी संघाने तब्बल ८ कोटी २५ लाख खर्च केले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
IPL Auction: इंग्लडचा ‘हा’ गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात दाखल; १.५० कोटींची लागली बोली
‘सीएसके फॅमिली’त अजून एका मराठमोळ्या खेळाडूची एन्ट्री, मुंबईच्या प्रशांत सोळंकीची ताफ्यात निवड