इंडियन प्रीमीयर लीगचा (IPL 2022) यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. अष्टपैलू कृणाल पांड्या पुढच्या हंगामात आता लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळताना दिसणार आहे.
मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा अष्टपैलू कृणाल पांड्यावर मोठी बोली लागली. पुढच्या हंगामापासून स्पर्धेत नव्याने सामील होणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने त्याला अखेर ८ कोटी २५ लाख रुपयांमध्ये खरेदी केले. मागच्या हंगामात कृणाल मुंबई इंडियंससाचे प्रतिनिधित्व करत होता. परंतु २०२२ हंगामासाठी मुंबईने त्याच्याव विश्वास दाखवलेला दिसत नाहीय. मुंबई इंडियन्सने पुढच्या हंगामापूर्वी हार्दिक आणि कृणाल या दोघा भावांना रिलीज केले होते आणि मेगा लिलावात कृणालवर बोलीही लावली नाही.
यापूर्वी कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या हे दोघे भाऊ-भाऊ भारतीय संघासोबत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे महत्वाचे खेळाडू होते. परंतु मागच्या जवळपास दोन वर्षांपासून दोघांचेही प्रदर्शन निराशाजन राहिले आहे. असे असले तरी, गुजरात टायटन्सने मेगा लिलावापूर्वीच हार्दिक पांड्याला १५ कोटी रुपयांमध्ये संघात रिटेन केले होते. हार्दिक पुढच्या हंगामात गुजरात संघाचे नेतृत्वही करणार आहे. अशात आता कृणालनेही मेगा लिलावात चांगली कमाई केल्याचे दिसत आहे. दोघा भावांचे अलिकडच्या काळातील प्रदर्शन पाहता, त्यांना लिलावात अधिक पैसे मिळणार नाहीत, अशीच अपेक्षा होती. परंतु दोघांनी मोठा हात मारल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
आता बटरलसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणा अश्विन! सेहवागने जुन्या वादाची काढली आठवण
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरलाय ‘वनिंदू हसरंगा’, घेतली भलीमोठी रक्कम
टीम इंडियाच्या शिलेदारांचे मेगा लिलावावर लक्ष! कॅप्टन रोहितने शेअर केला खास फोटो