आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी बीसीसीआयने आयोजित केलेला मेगा लिलाव रविवारी रात्री (१३ फेब्रुवारी) संपला. मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी या दोन दिवशी बेंगलोरमध्ये पार पडला. यावर्षीच्या मेगा लिलावात आठ ऐवजी १० संघांनी खेळाडूंवर बोली लावली. युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन यावर्षी मेगा लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. जाणून घेऊया आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाविषयी.
आयपीएल २०२२ पूर्वी आयोजित केल्या गेलेल्या मेगा लिलावासाठी एकूण ५९० खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली गेली होती. या ५९० खेळाडूंवर लिलावात बोली लागणार होती. परंतु लिलावात प्रत्यक्ष बोली फक्त २०४ खेळाडूंवर लागली आणि ते वेगवेगळ्या संघात सहभागी झाले. या २०४ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व फ्रेंचायझींनी मिळून एकूण ५५१ कोटी रुपये खर्च केले.
यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने तब्बल १५ कोटी आणि २५ लाख रुपये खर्च करून ईशानला पुन्हा एकदा संघात सामील केले. वेगवान गोलंदाज दीपक चहर यावर्षीच्या लिलावातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहरसाठी सर्वात मोठी १४ कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला संघात सामील केले. लियाम लिविंगस्टोन मेगा लिवातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर सर्वात महागडा विदेशी खेळाडू देखील ठरला. लिविंगस्टोनसाठी पंजाब किंग्जने ११ कोटी ५० लाख रुपये खर्च केले.
मेगा लिलावात यावर्षी अनेक युवा आणि दिग्गजांनी कोट्यावधी रुपये कमावले असले, तरी काही दिग्गज असे आहेत, ज्यांना लिलावात खरेदीदार सुद्धा मिळाला नाही. मागच्या वर्षी पार पडलेल्या टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले. एरॉन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी केली. पण आयपीएल २०२२ मध्ये फिंचला एकाही संघाने विश्वास दाखवला नाही. एरॉन फिंच अनसोल्ड राहिला. अशीच अवस्था २०१९ मध्ये इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या ओएन मॉर्गनची झाली. मॉर्गनवरही कोणत्याच संघाकडून बोली लावली गेली नाही. मागच्या वर्षी मॉर्गनच्या नेतृत्वात केकेआरने अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. अनसोल्ड खेळाडूंमध्ये तिसरे मोठे नाव म्हणजे, माजी भारतीय फलंदाज सुरेश रैना. सुरेश रैना एके काळी मिस्टर आयपीएल नावाने ओळखला जायचा, परंतु यावर्षी मात्र त्याला कोणत्याच संघाने विकत घेतले नाही.
मेगा लिलावासाठी प्रत्येक फ्रेंचायझीला पैसे खर्च करण्यावर मर्यादा घातल्या गेल्या होत्या. मेगा लिलावापूर्वी रिटेन केलेले खेळाडू आणि मेगा लिलावात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी फ्रेंचायझींना एकूण ९० कोटी रुपयांची मर्यादा घालून दिली होती. मेगा लिलावानंतर पंजाब किंग्जकडे सर्वात जास्त ३.४५ कोटी रुपये शिल्लक राहिले. त्यानंतर नंबर नाव येतो चेन्नई सुपर किंग्जचा, ज्यांच्याकडे लिलावानंतर २.९५ कोटी रुपये शिल्लक राहिले. तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आहे, ज्याच्याकडे १.५५ कोटी रुपये शिल्लक आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘सचिनपुत्रा’ची यावर्षी वाढली किंमत! ‘इतक्या’ रकमेसह झाला मुंबई इंडियन्सचा भाग
मुंबईने घडविलेल्या ‘या’ गोलंदाजाला केकेआरने केले आपल्या ताफ्यात सामील