---Advertisement---

रोहितच्या पलटणने ‘या’ युवा अष्टपैलूवर खर्च केले १.७० कोटी, पाहा त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

Mumbai-Indians
---Advertisement---

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझी सामील होणार आहेत. या दोन नवीन फ्रेंचायझींच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये मेगा लिलाव (IPL maga auction) आयोजीत केला. मेगा लिलावात अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला आणि मोठ्या बोली लावल्या. या लिलावात काही युवा खेळाडूही कोट्यधीश झाले. मुंबई इंडियन्सने लिलावाच्या दुसऱ्या दिवशी युवा अष्टपैलू खेळाडू तिलक वर्मा (tilak varma) याच्यासाठी तब्बल १ कोटी आणि ७० लाख रुपये मोजले.

तिलक वर्मा भारताचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत देशासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाहीय, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. २०१८-१९ मध्ये त्याने हैदरबादच्या रणजी संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१९ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून हैदराबादसाठी देशांतर्गत टी-२० मध्ये पदार्पण केले. आता मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएमध्ये खेळण्याची संधी दिली आहे.

आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सने मेगा लिलावापूर्वी त्यांच्या संघातील चार महत्वाच्या खेळाडूंना रिटेन केले होते. या चार खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड यांचास मावेश होता. रोहितसाठी मुंबईने १६ कोटी खर्च केले होते, बुमराहला रिटेन करण्यासाठी १२ कोटी, सूर्यकुमारसाठी ८ आणि पोलार्डसाठी ६ कोटी रुपये मोजले होते.

रिटेन केलेल्या खेळाडूंवर खर्च केकेल्या रक्कमेनंतर मुंबईकडे मेगा लिलावासाठी ४८ करोड रुपये शिल्लक होते. लिलावात त्यांनी ईशान किशनला पुन्हा सांघात घेण्यासाठी १५.२५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. त्याव्यतिरिक्त दक्षिण अफ्रिकेच्या १९ वर्षाखालील संघात सहभागी असलेला डेवाल्ड ब्रेविससाठी मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात ३ कोटी रुपये खर्च केले. जयदेव उनादकटसाठी संघाने १.३० कोटी खर्च केले. यावरून यावर्षीच्या लिलावात संघ विचारपूर्वक खर्च करताना दिसला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बावाची IPL लिलावात हवा! वर्ल्डकपमधील कामगिरीने वाढला भाव, पंजाबने मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

‘मुंबईकर’ शिवम दुबेसाठी ‘सोनियाचा दिनू’! सकाळी बनला पिता, दुपारी करोडपती; CSK संघाकडून मोठी बोली

‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन हंगारगेकर बनला ‘सुपरकिंग’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---