आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी चाहत्यांमध्ये खुपच उत्सुकता दिसत आहे. बीसीसीआयने आगामी आयपीएल हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये (आरसीबी) मेगा लिलावाचे आयोजन केले. मेगा लिलावात अनेक दिग्गजांवर बोली लागल्या. अनेक खेळाडू मालामाल झाले, तर काहींना खरेदीदार देखील मिळाले नाहीत. फ्रेंचायझींना खेळाडूंवर रक्कम खर्च करण्याबाबत बंधने असल्यामुळे लिलाव हा एक अनुभवाचा खेळ बनतो. अशात न्यूझीलंडचा क्रिकेटपटू फिन एलन (finn allen) याला आरसीबीने लिलावाच्या दुसऱ्या दिवशी ताफ्यात सामील केले.
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा उजव्या हाताचा फलंदाज फिन एलन याने मेगा लिलवासाठी नाव नोंदवताना त्याची बेस प्राईस ५० लाख रुपये ठेवली होती. बेस प्राइसपेक्षा त्याला ३० लाख रुपये वाढवून मिळाले आहेत. आरसीबीने त्याच्यावर बोली लावली आहे. आरसीबीने त्याला संघात सामील करण्यासाठी ८० लाख रुपये मोजले.
आरसीबीने मेगा लिलावात आतापर्यंत चांगली खरेदी केली आहे. श्रीलंका संघाचा अष्टपैलू खेळाडू वानिंदु हसरंगा याला पुन्हा संघात घेण्यासाठी आरसीबीने तब्बल १० कोटी ७५ लाख रुपये खर्च केले. तसेच भारतीय संघाचा युवा गोलंदाज हर्षल पटेलसाठीही आरसीबीने १०.७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दीनेश कार्तिकला आरसीबीने ५.५० कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले. त्याव्यतिरिक्त अनकॅप्ड खेळाडू अनुज रावत (३.४० कोटी) आणि शाहबाज अहमद (२.४० कोटी) यांच्यासाठीही संघाने मोठी रक्कम मोजली.
आरसीबीने मेगा लिलावापूर्वी त्यांच्या संघातील तीन महत्वाच्या खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला होता. माजी कर्णधार विराट कोहलीला रिटेन करण्यासाठी आरसीबीने १५ कोटी रुपये मोजले. तसेच ऑस्ट्रेलिया संघाच महत्वाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला ११ कोटी आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला ७ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले गेले.
महत्वाच्या बातम्या –
पंजाबचे धन्यवाद, पण मला चेन्नईकडून अपेक्षा होत्या; शाहरुख खानने केल्या भावना व्यक्त
केरला ब्लास्टर्सचे लक्ष्य ‘टॉप फोर’चे