आयपीएल २०२२च्या चालू हंगातील ३७वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने पुन्हा एकदा शतकी खेळी करून दाखवली. मुंबई इंडियन्सविरुद्ध राहुलने केलेले चालू हंगामातील हे दुसरे शतक ठरले. या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर राहुल आता मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक वेळा ५० धावांपेक्षा मोठी खेळी करणारा फलंदाज बनला आहे.
हा विक्रम करण्यासाठी केएल राहुल (KL Rahul) सुरेश रैनाला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही आठवी वेळ आहे, जेव्हा राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ५० धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे. सुरेश रैनाने अशी कामगिरी ७ वेळा केली आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर आहे, ज्याने ६ वेळा अशी खेळी केली आहे.
KLass-In-Session
PC: भौकाल Alert! Yet another blistering 50* (37) by Kaptaan Sahab!#AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #LucknowSuperGiants #TataIPL #LSG2022 pic.twitter.com/nnqaE8FekB
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 24, 2022
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. गेलने देखील ६ वेळा मुंबई इंडियन्सविरुद्ध ५० पेक्षा अधिक धावा ठोकल्या आहेत. त्यानंतर मनीष पांडे आणि शिखर धवन यांनीही प्रत्येक ६ वेळा मुंबई इंडियन्सविरुद्ध ५० धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दरम्यान, ही तिसरी वेळ आहे, जेव्हा राहुलच्या बॅटमधून मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात शतक निघाले आहे. या कामगिरीनंतर राहुल टी२० क्रिकेटमधील पहिला आणि एकमेव खेळाडू बनला आहे, ज्याने एकाच संघाविरुद्ध तीन शतके ठोकली आहेत.
Kaptaan sahab in absolutely fine form 👑 Take a bow @klrahul11 #AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/xwu1qaxVIr
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 24, 2022
सामन्याचा विचार केला, तर रविवारी (२४ एप्रिल) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राहुलने ६२ चेंडू खेळले आणि यामध्ये १०३ धावा ठोकल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १२ चौकार तर ४ षटकार निघाले. राहुलच्या दमदार खेळीच्या जोरावर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक वेळा ५० धावांपेक्षा मोठी खेळी करणारे खेळाडू
८ – केएल राहुल*
७ – सुरेश रैना
६ – डेविड वॉर्नर
६ – ख्रिस गेल
६ – मनीष पांडे
६ – शिखर धवन
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईची गाडी पराभवाचे स्टेशन सोडेना! लखनऊने ३६ धावांनी विजय साकारत गुणतालिकेत पटकावला चौथा क्रमांक