मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात त्याच्या फलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. रविवारी (२४ एप्रिल) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर देखील रोहितने एक अप्रतिम झेल पकडून त्याच्या क्षेत्ररक्षणाचे कौशल्य दाखवले. असे असले तरी, रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ मधील पहिला विजय अद्याप मिळू शकलेला नाहीय.
रविवारी (२४ एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने ३६ धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मुंबई इंडियन्ससाठी चालू आयपीएल हंगामातील हा सलग तिसरा पराभव ठरला. लखनऊचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) चांलल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अप्रतिम झेल घेऊन त्याला तंबूत धाडले. रोहितने मैदानात दाखवलेल्या चपळाईसाठी त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मुंबईचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) डावातीच चौथे षटक टाकण्यासाठी आला. षटकातील ५ व्या चेंडूवर डी कॉकने डीप स्वेअर लेगला एक हवाई शॉट खेळला. हा चेंडू सीमारेषेजवळ उभा असलेल्या तिलक वर्माच्या हातात गेला, पण त्याला तो झेलता आला नाही. चेंडू तिलकच्या हातातून उडाला आणि सीमारेषेपलिकडे षटकरासाठी गेला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर देखील डी कॉकने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी चेंडू रोहितच्या हातात गेला, जो त्याने अचूकपणे झेलला.
डी कॉकने मारलेला हा शॉट त्याच्या बॅटमधून वेगात निघाला होता, पण रोहितने त्याचा योग्य अंदाज घेत झेल पकडला. विकेट गमावल्यानंतर डी कॉकला देखील स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ऑन स्ट्राइक फलंदाजापासून अवघ्या १५ यार्डच्या अंतरावर रोहित शॉर्ट कवरवर उभा होता. एवढ्या जवळच्या अंतरावर उभा असताना रोहितने पकडलेला हा झेल कौतुकास पात्र आहे आणि त्याचे कौतुक केले देखील जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Great catch by Captain Rohit to dismiss De Kock. pic.twitter.com/eIkwMgTLJs
— Johns. (@CricCrazyJohns) April 24, 2022
Did You Watch – Tale of 2 catches: Rohit redeems Tilak with a sharp catch 👌👌
📽️📽️https://t.co/Zvi8uwmg9I #TATAIPL #LSGvMI
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
लखनऊ आणि मुंबई (KSG vs MI) संघात झालेल्या या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १३२ धावा करू शकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: स्म्रीती मंधानाला नाही पटला रनआऊटना नवा नियम, बाद झाल्यानंतर विरोधी संघाशी घातला वाद
‘पंत म्हणजे यष्टीमागील दुसरा धोनी!’, कुलदीपने कारण सांगत गायले गुणगान
‘मी देखील बेजबाबदार खेळलो,’ रोहितने मुंबईच्या सलग ८ व्या पराभावानंतर मान्य केली चूक