Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीएसकेचा परदेशी शिलेदार चढला बोहल्यावर, प्रेयसीशी बांधली लग्नगाठ; PHOTO व्हायरल

सीएसकेचा परदेशी शिलेदार चढला बोहल्यावर, प्रेयसीशी बांधली लग्नगाठ; PHOTO व्हायरल

April 25, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Devon-Conway-&-Wife

Photo Courtesy: Instagram/@chennaiipl


आयपीएल २०२२ ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जसाठी काही खास होऊ शकलेली नाही. पहिल्या सात सामन्यांपैकी सीएसकेला फक्त दोन सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकत ९ व्या क्रमांकावर आहे. आता अशातच त्यांचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉन्वे काही सामन्यांसाठी उपस्थित नाहीय. परंतु यामागेचे कारण खास आहे.

आयपीएलच्या मध्यात सीएसकेचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॅन्वे (Devon Conway) लग्नबंधनात पडला आहे. कॉन्वेने त्याची प्रेयसी किम वॉटसनसोबत संसार थाटला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने लग्नाच्या कारणास्तव आयपीएल २०२२ (IPL 2022) चा बायो बबल सोडला होता. बायो बबलमधून बाहेर पडल्यानंतर आयुष्यातील या खास क्षणासाठी कॉन्वे त्याच्या मायदेशासाठी म्हणजेच दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना झालेला. कॉन्वे जरी दक्षिण अफ्रिकेत जन्मला असला, तरी तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतो.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

सीएसकेसाठी अनुपस्थित असताना कॉन्वेचे लग्नातील फोटो मात्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कॉन्वे आणि किम गेल्या काही वर्षांपासून एकत्र आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार दोघांचे प्रेमसंबंध मागच्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून आहेत. आयपीएल २०२२ (IPL 2022) चा बायो बबल सोडण्याआधी सीएसकेने त्याच्यासाठी एक पारंपारिक प्री वेडिंग पार्टी आयोजित केली होती. या पार्टीतील अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. यामध्ये एमएस धोनीसह संघातील इतर खेळाडू कॉन्वेसोबत दिसले होते.

புது மாப்பிள்ளைக்கு பப்பப்பரே.நல்ல யோகமடா பப்பப்பரே.அந்த மணமகள்தான் பப்பப்பரே. வந்த நேரமடா பப்பப்பரே! 💛

Congratulations Conway & Kim 🤩💛#WhistlePodu #CSK
🎥 @asifkm24 pic.twitter.com/0JVeCtIWLG

— WhistlePodu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) April 19, 2022

We pronounce you Lion and Lady! Happy #WeddingWhistles to Kim & Conway! 💛#SuperFam #WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/NxvybLpcXO

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 24, 2022

कॉनवेच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर यावर्षी पहिल्यांदाच तो या टी-२० लीगमध्ये सहभागी झाला आहे. चालू हंगाम सुरू होण्यापूर्वी पार पडलेल्या मेगा लिलावात सीएसकेले त्याच्या संघात घेण्यासाठी १ कोटी रुपये खर्च केले होते. सीएसकेला तो बेस प्राइसवर मिळाला होता. असे असले तरी, त्याला आयपीएलमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. चालू हंगामात त्याला फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळलेल्या या सामन्यात त्याने अवघ्या ३ धावा करून विकेट गमावली होती.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘त्यामुळे’ सचिन सेहवागला नेहमी चारायचा केळी, खास दिवशी विरूने दिला जुन्या आठवणीला उजाळा

क्रिकेटर नसता, तर कोण झाला असता जोस बटलर? आर अश्विनला दिले ‘हे’ उत्तर

Video: स्म्रीती मंधानाला नाही पटला रनआऊटचा नवा नियम, बाद झाल्यानंतर विरोधी संघाशी घातला वाद


ADVERTISEMENT
Next Post
Rohit-Sharma

सलग ८ पराभवांनंतर रोहित शर्माचे तुटले हृदय, केले भावूक ट्वीट; चाहत्यांचेही मानले आभार

KL-Rahul-Umpire-Undkat-Injury

हुश्श वाचले! केएल राहुलच्या तेज तर्रार शॉटने फोडलं असतं मुंबईच्या गोलंदाज अन् पंचाचं डोकं- Video

Shikhar-Dhawan

सामना एक, रेकॉर्ड अनेक! सीएसकेविरुद्ध शिखर धवनचा 'गब्बर' पराक्रम, रचले विक्रमांचे मनोरे

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.